सुनेत्रा पवार यांची पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती, राज्य सरकारने केली घोषणा!

Dhak Lekhanicha
0

 सुनेत्रा पवार यांची पुणे व बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती, राज्य सरकारने केली घोषणा!


शिरूर पुणे प्रतिनिधी-

सुनेत्रा पवार यांना पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर (विमान अपघातात) त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. आता राज्य सरकारने ३ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पुणे आणि बीड या दोन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडेच सोपवले आहे. पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता, तर बीड जिल्ह्यातही त्यांचा मोठा प्रभाव होता.अजित पवारांचा धडाका सुनेत्रा पवार यांना जमेल का?

हे प्रश्न आता राजकीय नेते, कार्यकर्ते आणि जनतेमध्ये चर्चेत आहे. अजित पवार हे 'धडाकेबाज' नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांचा प्रशासकीय धडाका, निर्णयक्षमता आणि जिल्ह्यांतील विकासकामांसाठीची धावपळ यामुळे पुणे आणि बीडमध्ये त्यांची मजबूत पकड होती. पुणे जिल्हा हा राज्याची आर्थिक राजधानी म्हणून ओळखला जातो, तर बीड हा मराठवाड्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. अजित पवार यांनी या दोन्ही जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रकल्प, पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील कामे केली होती.सुनेत्रा पवार यांच्याकडे आता उपमुख्यमंत्रीपदाबरोबरच ही मोठी जबाबदारी आली आहे. त्यांना उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास ही खाती मिळाली आहेत, पण अर्थ खाते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहिले आहे. सुनेत्रा पवार या पारंपरिक राजकारणात नव्या असल्या तरी त्यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली होती . तदनंतर त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून काम करत होत्या, त्यांचा सामाजिक कार्य, शेती आणि ग्रामीण विकासाशी संबंधित अनुभव आहे.


राजकीय निरीक्षकांचे मत आहे की, अजित पवार यांच्या 'धडाकेबाज' शैलीची जागा घेणे सोपे नाही. सुनेत्रा पवार यांना टीम तयार करून, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून आणि विकासकामांना गती देऊन हे सिद्ध करावे लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये त्यांना पाठिंबा आहे, पण बीड आणि पुण्यातील स्थानिक नेते, आमदार आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा खूप मोठी आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीच्या कोट्यातील असल्याने हा निर्णय पक्षाच्या हिताचा मानला जात आहे.काही जण म्हणतात, "अजितदादांचा वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांच्याकडे संधी आहे, पण त्यांचा धडाका आणि निर्णयक्षमता तपासली जाईल." तर काहींचे मत आहे की, "महिला नेत्यांच्या नेतृत्वात हे जिल्हे नव्या उंचीवर जातील." पण प्रत्यक्ष कामगिरीवरच हे उत्तर मिळेल.सध्या सुनेत्रा पवार यांनी या जबाबदारीची सुरुवात केली असून, लवकरच त्या जिल्ह्यांत दौरे आणि आढाव्यांना सुरुवात करणार असल्याचे संकेत आहेत. पुढील काळात त्यांची कामगिरीच ठरवेल की, अजित पवार यांचा धडाका त्या कश्या पद्धतीने राबवतील.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!