स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर धडक कारवाई - ३ ठिकाणी धाड, गांजा व गुटख्यासह ४ आरोपी अटकेत

Dhak Lekhanicha
0

 स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यांवर शिरूर येथे धडक कारवाई - ३ ठिकाणी धाड, गांजा व गुटख्यासह ४ आरोपी अटकेत


शिरूर, (सुदर्शन दरेकर)– स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध गांजा व गुटखा विक्रीवर धडक कारवाई करत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून १२ किलो गांजा व रु. ३,५६,७८१/- किमतीचा गुटखा जप्त केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.


 ४ किलो गांजासह दोन जण अटकेत

दि. २५ जुलै रोजी स.पो.नि. कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे अहमदाबाद फाटा येथे सापळा लावण्यात आला. संशयित शुभम शंकर मोहिते (२९) व विजय केमराज काळे (२९) यांच्याकडून ४.१८५ किलो गांजा (किंमत ८०,०००/-) व मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्यांच्यावर NDPS कायदा कलम 8(सी), 20(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.


गुटखा साठ्यासह एक जण अटकेत


त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत गुलमोहर अपार्टमेंट, बुरुड आळी, शिरूर येथील रफिक चाँद शेख  याच्या घरात छापा टाकून ३,५६,७८१/- रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला. आरोपीवर BNS कलम 123, 274, 275, 223 व FSSAI अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 ८ किलो गांजासह आरोपी गजाआड


दि. २६ जुलै रोजी मंगलमुर्ती नगर, शिरूर येथे छापा टाकून रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे याच्या घरातून ८ किलो गांजा (किंमत १,२०,०००/-) जप्त करण्यात आला. आरोपीवर NDPS कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकात स.पो.नि. कुलदीप संकपाळ, पो.नि. संदेश केंजळे, स.पो.नि. दिपक कारंडे, पो.स.ई. दिलीप पवार, तसेच सागर शेळके, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीन, जगताप, नितीन सुद्रीक, भाग्यश्री जाधव, सचिन भोई यांनी सहभाग घेतला.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!