21 नोव्हेंबरनंतर आता शिरूरमध्ये ‘राजकीय भूकंप’ संभव — कोण कोणाच्या बाजूला?होणार चित्र स्पष्ट

Dhak Lekhanicha
0

 21 नोव्हेंबरनंतर आता शिरूरमध्ये ‘राजकीय भूकंप’ संभव — कोण कोणाच्या बाजूला?होणार चित्र स्पष्ट


शिरूर:सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक)

राज्यात नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. मागील चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष तिकीट वाटपाच्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. राज्यात महायुतीचे भक्कम सरकार असले तरी, स्थानिक स्तरावर सर्व कार्यकर्त्यांना सामावून घेणे हेच त्यांच्या नेतृत्वासमोरचे मोठे आव्हान ठरत आहे.


यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)कडून प्रदेशभर भाजपला वगळून समविचारी पक्षांबरोबर आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल राज्यातील पुढील ZP, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांवर सरळ परिणाम करणार असल्याने सर्वच पक्षांनी या निवडणुकांना प्रचंड गांभीर्याने घेतले आहे.


पुणे जिल्ह्यात विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या दोन्ही पक्षांमध्ये छुप्या समझोत्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे. कोणत्या नगरपालिकेत कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.


शिरूर नगरपालिका निवडणुकीतही तापलेल्या वातावरणात आज खासदार अमोल कोल्हे यांनी महत्त्वाचे विधान केले.

महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले; मात्र अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतच होईल, असेही ते म्हणाले.


शिरूरमध्ये भाजपाने नगराध्यक्ष पदावर दावा केला असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्याकडूनही या पदासाठी ‘दावा’ अधिकृतपणे करण्यात आला आहे.

दुसरीकडे, शिरूर शहर विकास आघाडी व लोकशाही क्रांती आघाडी या स्थानिक आघाड्यांनी अनेक वर्षे निवडणुका लढवल्या; यावेळी या दोन्ही आघाड्या निवडणुकीच्या मैदानात नसल्याने  यंदा प्रथमच पक्षचिन्हावर निवडणूक होत असल्याने शिरूरमध्ये चुरस अधिक वाढली आहे.


खरे राजकीय चित्र 21 नोव्हेंबरनंतर स्पष्ट होणार असून, शिरूरसह संपूर्ण जिल्ह्यातील राजकारणाला यातून मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!