शिरूर येथे श्रीमद् भागवतम् कथामृत सोहळ्याचे आयोजन
शिरूर (घोडनदी) येथे विश्व सनातन धर्म श्रीमद् भागवत महापुराण व त्रिकाल संध्या प्रचार संघटनेच्या वतीने श्रीमद् भागवतम् कथामृत या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कथासोहळा दि. ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ४.३० ते ८ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.
या कथामृत सोहळ्याचे कथावाचन जगन्नाथ संस्कृतीचे विश्वशास्त्र विशारद परम पूज्य पंडित डॉ. काशिनाथ मिश्रजी यांच्या अमृतवाणीने होणार आहे. शास्त्र व आचार्यांच्या अनुसार श्रीमद् भागवत सप्ताहाचे श्रवण केल्याने कलियुगात निश्चितच शांती व स्थैर्य प्राप्त होते, असे आयोजकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या मंगलमय आयोजनासाठी श्री गणपती मंडळ तसेच विश्व सनातन धर्म श्रीमद् भागवत महापुराण व त्रिकाल संध्या प्रचार संघटना यांनी पुढाकार घेतला आहे. कलियुगातील विविध संकटांपासून मुक्ती व कुटुंबीयांच्या सुरक्षिततेसाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आशा बारणे यांनी केले.यावेळी अजिनाथ मालुसरे, महेंद्र परदेशी, चंद्रकांत वर्पे, राजेंद्र डोंगरे, दिलीप बारणे, अजित कर्डीले उपस्थित होते.

