गळ्यात खिळ्याचा पट्टा, कांद्याची माळ घालून शिरूरला उमेदवारी अर्ज दाखल; रांजणगाव गणात लक्षवेधी आंदोलनात्मक एन्ट्री

Dhak Lekhanicha
0

 गळ्यात खिळ्याचा पट्टा, कांद्याची माळ घालून रांजणगाव पंचायत समिती गणातुन संदीप सोनवणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

रांजणगाव गणात लक्षवेधी आंदोलनात्मक एन्ट्री 


शिरूर- सुदर्शन दरेकर( कार्यकारी संपादक)

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती पंचायत समिती गणासाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पिंपरी दुमाला येथील उमेदवारांनी अनोख्या पद्धतीने अर्ज दाखल करत सर्वांचे लक्ष वेधले. गळ्यात खिळ्याचा पट्टा आणि कांद्याची माळ घालून संबंधित उमेदवार थेट शिरूर येथील अर्ज भरण्याच्या ठिकाणी पोहोचले.

पंचायत समिती गणातील मूलभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या, तसेच सध्या वाढलेली बिबट्याची दहशत, कांदा बाजारातील घसरलेले दर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हा आंदोलनात्मक प्रकार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या अनोख्या एन्ट्रीमुळे निवडणूक वातावरणात चर्चेला उधाण आले असून परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!