जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी मांडले मतदारांचे आभार,
शिरूर प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने विरोधकांच्या विखारी प्रचाराला आपल्या ठोस विकासाच्या व्हिजनने प्रभावी उत्तर देत नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत दैदिप्यमान यश संपादन केले. या ऐतिहासिक यशाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी हे यश देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे तसेच असंख्य कार्यकर्त्यांच्या अखंड परिश्रमांचे फलित असल्याचे मत व्यक्त केले. विकास, सुशासन आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर जनतेने दिलेला हा कौल महायुती सरकारच्या कामगिरीवरचा विश्वास अधोरेखित करणारा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
भेटीदरम्यान आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीला लागण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. संघटन बळकट करणे, बूथस्तरीय नियोजन आणि विकासकामांचा आढावा यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. आगामी निवडणुकांतही हा विश्वास कायम राखून विजयाची घौडदौड सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
