बाबुराव नगर येथील जय भवानी महिला मंडळाने देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढून केली स्थापना
शिरूर (प्रतिनिधी) : बाबुराव नगरातील जय भवानी सांस्कृतिक महिला मंडळ यांच्या वतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव २०२५ मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना करण्यात आली.
आरास, आकर्षक सजावट आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी परिसरात सणोत्सवाचे वातावरण रंगून गेले आहे.
दररोज सकाळी व संध्याकाळी देवीची आरती भक्तिभावाने पार पडत असून, मंडळाने महिलांसाठी, मुलांसाठी आणि युवकांसाठी खास उपक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा, आरती स्पर्धा, दांडिया-गरबा, पारंपरिक खाद्यपदार्थ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा यांचा समावेश आहे. तसेच सत्कार फिल्म्स प्रस्तुत पैठणी सोहळा ही विशेष आकर्षण ठरणार आहे.
या उत्सवाचे आयोजन अध्यक्षा धनश्री ताई संतोष शेठ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून, उपाध्यक्षा ज्योतीताई शहाणे,उत्पादन शुल्क अधिकारी प्रियंका मच्छिंद्र पावडे,वनिता दीपक देवकर, प्रमिला रमेश खणकर, मीरा दादाभाऊ साठे,सीमा दिलीप भिसे, कविता नाथा पठारे, संजीवनी शंकर निचित, आशा शहाजी पवार आदी पदाधिकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली आहे.
यासोबतच मंडळाचे आधारस्तंभ खरेदी विक्री संघाचे मा.संचालक संतोष शेठ मोरे,सचिन घावटे (उपसरपंच शिरूर ग्रामीण), अनिल घावटे, शुभम शहाणे, धनु कुलांगे, विशाल पवार, समीर मुजावर, शाबिर मुजावर, मनोज जगदाळे, रवी काळे, अरमान शेख, आर्यन जामदार, विशाल लंके, स्वप्निल रणदिवे यांनी परिश्रम घेऊन उत्सवाची मांडणी केली. मंडप व डेकोरेशनचे काम पी. एम. इव्हेंट यांनी आकर्षक पद्धतीने साकारले आहे.
महिला वर्गाचा विशेष उत्स्फूर्त सहभाग या उत्सवात दिसून येतो. गीतांजली अमित साळवे, नीलम अनिल सोनवणे, रितेशा श्रीनाथ शेवाळे, रंजना बाळासाहेब शेवाळे, रूपाली प्रशांत कर्डिले, जिजा ताई सुरेश दुर्गे, मंगल ताई प्रकाश कवठाळे, सीमाताई दत्तात्रेय फराटे, विजया संतोष जाधव, शैलजा मच्छिंद्र पावडे, सुवर्णा नितीन बोराडे, रितू दीपक शिंदे यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
गडगडाटी ढोल-ताशांच्या गजरात व भक्तिगीतांच्या सुरावटींमध्ये नवरात्र उत्सव साजरा होत असून, अख्खा परिसर देवीमय झालेला आहे. पुढील नऊ दिवस विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्तिभाव आणि उत्साहाचा संगम अनुभवायला मिळणार आहे.




.jpg)