आधुनिक लहुजी सेनेचा चौथा वर्धापन दिन शिरूर येथे उत्साहात साजरा
या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुणे व नगर जिल्ह्यातील शेकडो जिगरबाज, अभ्यासू कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात व आतषबाजी करत संघटनेत प्रवेश केला. "जय लहुजी", "आधुनिक लहुजी सेनेचा विजय असो" या घोषणा देत वातावरण दणाणून गेले होते.
या कार्यक्रमात अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
त्यामध्ये विजय मोहिते (जिल्हाध्यक्ष पुणे),संजय फाजगे (जिल्हाध्यक्ष युवती पुणे),रोहिणीताई शेंडगे (जिल्हाध्यक्ष महिला आघाडी पुणे),सचिनभाऊ काळोखे (जिल्हाध्यक्ष कोकण पुणे),
संदीपभाऊ अवचिते (लोकसभा उपाध्यक्ष नगर),अर्चनाताई शेंडगे (जिल्हा उपाध्यक्षा म.आ. पुणे),संतोषभाऊ जाधव (जिल्हा उपाध्यक्ष पुणे),भाऊसाहेब साठे (विधानसभाध्यक्ष शिरूर),नागेशभाऊ साळवे (तालुकाध्यक्ष शिरूर),अक्षय शेलार (तालुकाध्यक्ष यु. शिरूर),रेश्माताई जाधव (तालुकाध्यक्ष म.आ. दौंड),आकाश पंचरास (तालुकाध्यक्ष आंबेगाव),राज बनसोडे (ता. यु. कार्याध्यक्ष हवेली),राहुल जाधव (ता. कार्याध्यक्ष शिरूर),राहुल सकट (ता. सचिव शिरूर),सारिका जाधव (ता. उपाध्यक्षा म.आ. दौंड),दयाताई मुंडे (महासचिव म.आ. शिरूर),सोमनाथभाऊ साबळे (शहराध्यक्ष शिरूर),सोनुभाऊ काळोखे (शहराध्यक्ष शिरूर),ओंमकार आडागळे (शहराध्यक्ष यु. शिरूर),बाळासाहेब शेंडगे (यु. शहर कार्याध्यक्ष शिरूर),सुनील बागवे (यु. उपाध्यक्ष शिरूर),रुपालीताई सकट (शहर उपाध्यक्षा शिरूर),प्रताप शेंडगे (शहर कार्याध्यक्ष यु. शिरूर).
या वेळी मार्गदर्शन करताना नगिनाताई कांबळे म्हणाल्या की, “समाजाच्या परिवर्तन चळवळीत झटणारे नवे कार्यकर्ते संघटनेत दाखल झाल्याने सेनेची ताकद आणखीन वाढली आहे. आधुनिक फकिरा सोमनाथभाऊ कांबळे यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव असलेले प्रामाणिक कार्यकर्ते संघटनेच्या कार्याला गती देतील.”
कार्यक्रमाला राज्य प्रवक्ते लक्ष्मणभाऊ क्षीरसागर, राज्य सचिव राहुलभाऊ आरडे, युवा नेतृत्व मृणालभैय्या कांबळे, पश्चिम महाराष्ट्र म.आ. अध्यक्ष स्वातीताई आरडे, सोलापूर जिल्हाध्यक्ष तानाजीभाऊ साठे, नगर जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ शिंदे, नगर जिल्हा मीडिया अध्यक्ष अजयभाऊ शिंदे, धाराशिव मीडिया जिल्हाध्यक्ष विजयभाऊ कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेकडो समाजबांधव व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
