श्री क्षेत्र रांजणगाव येथे भव्य गणेशोत्सव सोहळ्याला २४ ऑगस्टपासून सुरुवात भक्तांना मिळणार मुक्त द्वार दर्शन
शिरूर: सुदर्शन दरेकर( कार्यकारी संपादक)
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे श्री महागणपती मंदिरात भाद्रपद गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा सोहळा भाद्रपद शु. प्रतिपदा रविवार दि. २४ ऑगस्ट २०२५ ते भाद्रपद शु. सप्तमी शनिवार दि. ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत पार पडणार असून या काळात भाविकांना मुक्तद्वार दर्शनाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे.
📌 प्रमुख कार्यक्रम :
२४ ऑगस्ट : गणेशोत्सवाची सुरुवात, सकाळी १० वाजता श्रींच्या पालखीची पूर्वव्दार यात्रा (करडे मांजराई देवी).
२५ ऑगस्ट : दक्षिणव्दार यात्रा (निमगाव म्हाळुंगी आसराई देवी).
२६ ऑगस्ट : पश्चिमव्दार यात्रा (गणेगाव ओझराई देवी).
२७ ऑगस्ट – गणेश चतुर्थी :
दुपारी १२.१५ वा. उत्तरव्दार यात्रा (ढोक सांगवी मुक्ताई देवी).
सायं. ७ ते ९ पालखी मिरवणूक.
रात्री १० ते १२ ह.भ.प. अवधूत चक्रांकित महाराज आळंदीकर यांचे कीर्तन.
२८ ऑगस्ट : सकाळी पालखी मिरवणूक (देऊळवाडा व देवस्थान कर्मचारी), दुपारी १२.३० ते ३ वाजता महाप्रसाद.
दुपारी ४ ते ६ ह.भ.प. आचार्य परमेश्वरजी महाराज (दैवदैठण) यांचे काल्याचे व पाऊल घडीचे कीर्तन.
सायं. ६ वा. श्रींची प्रक्षाळ पूजा.
दररोज रात्री ८ वाजता श्री गोस्था गोसावी गणेश सांप्रदायी आस्त्या तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्वस्त मंडळाचे आवाहन
मुख्य विश्वस्त डॉ. ओमकार नितीन देव, अध्यक्षा सौ. स्वातीताई दत्तात्रय पाचुंटकर पाटील, सचिव डॉ. सुधार बाळासाहेब पाकुंडकर पाटील, खजिनदार श्री. विजय काशिनाय देव तसेच सर्व विश्वस्त, सेवेकरीवृंद व ग्रामस्थ रांजणगाव गणपती यांनी सर्व गणेशभक्तांना या सोहळ्यात सहभागी होऊन श्री महागणपतीच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
