१५ लाखांचे ५५ मोबाईल शोधून शिरूर पोलिसांकडून मूळ मालकांच्या स्वाधीन
शिरूर : सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक )
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेले तब्बल १५ लाख २४ हजार ५०० रुपये किंमतीचे ५५ मोबाईल फोन शिरूर तपास पथकाने शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले.
गेल्या काही महिन्यांत शिरूर बाजारपेठ, बसस्टँड परिसर व इतर ठिकाणांहून अनेक मोबाईल हरवल्याचे अर्ज दाखल झाले होते. यावरून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विजय शिंदे यांनी तांत्रिक तपास करून महाराष्ट्र व कर्नाटकमधील विविध जिल्ह्यांतून हे मोबाईल शोधून काढले. या कारवाईत कर्नाटकातील हवेरी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार हनुमंता जनागेरी यांनीही मदत केली.
आज (दि. २२ ऑगस्ट) रोजी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.
सन २०२५ मध्ये शिरूर पोलिसांनी आतापर्यंत १२५ गहाळ मोबाईल शोधून मालकांना परत केले आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण तसेच हवालदार नाथसाहेब जगताप व अंमलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, पवन तायडे, निखील रावडे, अजय पाटील, रविंद्र आव्हाड यांनी सहभाग घेतला.
