शांततेत व भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन – तहसीलदार बाळासाहेब म्हस्के

Dhak Lekhanicha
0

 शांततेत व भक्तीमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन – तहसीलदार बाळासाहेब म्हस्के



शिरूर : सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक )

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिरूर शहरात तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस पोलीस प्रशासन, नगरपरिषद, महावितरण विभागाचे अधिकारी तसेच गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


बैठकीत तहसीलदार म्हस्के यांनी गणेशोत्सव शांततेत, भक्तीमय वातावरणात आणि प्रदूषणमुक्त पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट अजिबात वापरू नये तसेच डीजेविरहित पारंपारिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.



नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात येईल. तसेच नागरिकांच्या मागणीनुसार कृत्रिम तलावांची संख्या वाढवली जाणार आहे.



यावेळी रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव वाघमोडे यांनी मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना केल्या व त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले, जी गणेशोत्सव मंडळे कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, जिल्हा प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव काळात येणारे सूचना मंडळापर्यंत पोहोचवल्या जातील . प्रत्येक गणेशोत्सव मंडळाला एक पोलीस अंमलदार संपर्कासाठी उपलब्ध करून देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली. तर महावितरण (MSEB) विभागाला मिरवणूक मार्गावरील वीजवाहिन्या व्यवस्थित ठेवण्याचे निर्देश दिले गेले, जेणेकरून वाहतुकीस आणि मिरवणुकीस अडथळा येणार नाही.


 संजय बारवकर ( डंबे नाला मित्र मंडळ) यांनी पारंपारिक व प्रदूषणमुक्त गणेशोत्सवाचे महत्त्व सांगितले. तर शरद पवार यांनी पारंपारिक वाद्ये रात्री बारा वाजेपर्यंत वाजवण्यास परवानगी मिळावी अशी विनंती केली. याशिवाय सुनील जाधव महावितरण संबंधित सूचना मांडल्या,पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. त्यावेळेस शिरूर शहरातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!