शिरूर-हवेलीच्या सर्वांगीण विकासासाठी 2000 कोटींपेक्षा अधिक निधी – आमदार माऊली आबा कटके
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
शिरूर, हवेली : सुदर्शन दरेकर( कार्यकारी संपादक)
राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त आमदार माऊली कटके यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा दिल्याबरोबरच त्यांनी शिरूर-हवेली मतदारसंघात झालेल्या व होत असलेल्या भरीव विकासकामांचा आढावा देखील सादर केला आहे.
🔹 आगामी पाच वर्षांसाठी ‘वाहतूक कोंडीतून मुक्ती’चा संकल्प
आमदार माऊली आबा कटके यांनी सांगितले की, “येणाऱ्या काळात अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर हवेली मतदारसंघात प्रचंड विकास होणार असून नागरिकांना वाहतूक कोंडीमुक्त रस्त्यांची सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
प्रमुख विकासकामे व निधी मंजुरीचे तपशील:
▪️ पुणे ते शिरूर (54 किमी) उन्नत मार्गासाठी 7,515 कोटी रुपयांचा निधी मंजूर
▪️ तळेगाव ते चाकण (25 किमी) चार पदरी उन्नत मार्गासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित
▪️ हडपसर ते यवत सहा पदरी रस्ता – 5,262.36 कोटी रुपये निधी मंजूर
▪️ पुणे मेट्रो टप्पा 2 अंतर्गत रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2 ब) ला मागील मंजुरी
▪️ शिरूर-हवेली मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी – 40 कोटी 8 लक्ष 46 हजार रुपये मंजूर
▪️ मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आरोग्य उपचारांसाठी भरीव मदत
▪️ पुणे महानगर विकास प्राधिकरण अंतर्गत गावांच्या विकासासाठी – 2000 कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर
वाढदिवसानिमित्त विशेष आरोग्य शिबिर
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर-हवेली विधानसभा क्षेत्रात मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी आपल्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रावर जाऊन मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार कटके यांनी केले आहे.
एकच ध्यास – शिरूर-हवेलीचा सर्वांगीण विकास!
अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतून व देवेंद्र फडणवीस यांच्या अभ्यासू नेतृत्वातून शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भरीव प्रयत्न सुरू आहेत. या विकासयात्रेला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभेल, असा विश्वास आमदार माऊली कटके यांनी व्यक्त केला.


