माऊली आबा कटके यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी एकवटली; बदनामी प्रकरणी कारवाईची मागणी
शिरूर :सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक )
शिरूर हवेलीचेआमदार माऊली कटके व त्यांच्या बंधूंवर समाजमाध्यमांद्वारे खोटे आरोप केल्याच्या निषेधार्थ आज शिरूर शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. याप्रकरणी खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करत शिरूर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.
तालुकाध्यक्ष रवींद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, शहराध्यक्ष शरद कालेवार यांच्या नेतृत्वात ही कारवाई पार पडली.
या प्रसंगी तालुका युवक अध्यक्ष राहुल रणदिवे,शहर युवक अध्यक्ष एजाज बागवान,प्रमुख पदाधिकारी कुंडलिक शितोळे, शरद साठे, क्रीडा अध्यक्ष अतुल गव्हाणे, विद्यार्थी अध्यक्ष अमित गव्हाणे, रंजनभैय्या झांबरे, वसीम शहा, नरेंद्र कदम,
तसेच ज्ञानेश्वर कटके फाउंडेशनचे सुनील जाधव व स्वप्नील रेड्डी
यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
शहरातील आणि तालुक्यातील अनेक ठिकाणी याबाबत निषेध नोंदविण्यात आला असून, खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पोलिस निरीक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
कार्यकर्त्यांच्या एकमुखी नाराजीमुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
