रांजणगाव येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी निघाला मृत महिलेच्या बहिणीचा दिर

Dhak Lekhanicha
0

 रांजणगाव येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपी निघाला मृत महिलेच्या बहिणीचा दिर


 शिरूर ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी!

शिरूर प्रतिनिधी: सुदर्शन दरेकर

रांजणगाव गणपती येथील तिहेरी हत्याकांडातील मृत महिलेची व तिच्या दोन मुलांची ओळख पटली असून बहिणीच्या दिराने प्रेम संबंधातून लग्नाची मागणी करत असल्याने महिलेला व तिच्या दोन मुलांचा गळा आवळून व डोक्यात दगड घालून खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून आरोपींनी हे तिहेरी हत्याकांड घडून आणले असल्याची कबुली पोलीस तपासात दिली असून आरोपीला पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे.


     कुठलाही धागा दोरा नसताना पंधरा दिवस रात्र दिवस तपास करून आरोपीला बेड्या ठोकल्या असून, किचकट आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक संदीप गिल व पोलिस पथकाने लावल्याने पोलिसांचे सर्व थरातून कौतुक होत आहे.

      या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी जातीने लक्ष घातले होते तर या गुन्ह्याच्या तपासासाठी सहा पोलीस पथके तयार करण्यात आली होती अखेर कुठलाही धागा दोरा व सुगावा नसतानाही या गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते.

        तर या तेहरी हत्याकांडामुळे शिरूर तालुका पुणे जिल्हा व राज्यात खळबळ उडाली होती. या तिहेरी हत्याकांडाच्या तपास करणे करणे पोलिसांपुढे व नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या यांच्यापुढे मोठे आव्हान होते अखेर हे आव्हान पोलिसांनी पार करून आरोपीला जेरबंद केले आहे. पोलीस अधीक्षक संदीप गिल व पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.

          तिहेरी हत्याकांडाचा मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे (वय २५,)स्वराज (वय २ वर्षे), विराज ,(वय १ वर्षे रा. वाघोरा, ता. माजलगाव, जि. बीड) असे मृत महिलेचे व तिच्या दोन मुलाची नावे पोलिस तपासात निष्पन्न झाली आहेत.

     गोरख पोपट बोखारे (वय ३६, सध्या रा. सरदवाडी, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. चिखली, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) असे तिहेरी हत्याकांड करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला शिरूर न्यायालयात हजर केले असता अकरा जून पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, शिरूर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, दौंड विभागाचे उपविभागीय अधिकारी बापुराव दडस, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, AHTU पोलिस निरीक्षक विश्वास जाधव, स्थागुशा पोलिस उपनिरीक्षक. दत्ताजीराव मोहिते, रांजणगाव पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलिस उप निरीक्षक अविनाश थोरात, महिला पोलीस उपनिरीक्षक सविता काळे, शिक्रापूर पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे , स्थानिक गुन्हे शाखेचे दिपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, अक्षय नवले, संदीप वारे, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, राजु मोमीण, अतुल डेरे, सागर धुमाळ, मंगेश थिगळे, वाळासाहेब खडके, रामदास वावर, हनुमंत पासलकर, हेमंत विरोळे, निलेश शिंदे, अतुल फरांदे, महेश बनकर, विनोद भोकरे, काशिनाथ राजापूरे, रांजणगाव पोलीस स्टेशनचे गुलाब येळे, दत्तात्रय शिंदे, विलास आंबेकर, विजय सरजिने, उमेश कुतवळ, वैभव मोरे, योगेश गुंड, किशोर शिवणकर, केशव कोरडे, ज्ञानेश्वर शिंदे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे जयराज देवकर, अमोल नलगे, शिरूर पोलिस स्टेशन विजय शिंदे, निखील रावडे, नितेश थोरात, बीड जिल्हयात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय यादव, दरशथ बनसोडे, महादेव साळुंखे, गणेश वानकर, सुमीत वाघ, यांनी केली आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!