हुंडा नको, कर्ज काढून लग्न नको, प्री-वेडिंग बंद करा अन् मुलीच्या आईची संसारात ढवळाढवळ नको – मराठा समाजाची लग्नासाठी नव्या आचारसंहितेची घोषणा,
📍 शिरूर:सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक )
मराठा समाजात सध्या एक सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहे. विवाह व्यवस्थेत वाढत्या खर्चाला आणि अनावश्यक आडंबरांना आळा घालण्यासाठी मराठा समाजाने एक नवी 'विवाह आचारसंहिता' जाहीर केली आहे. समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही आचारसंहिता तयार करण्यात आली.
🔷 मुख्य मुद्दे – आचारसंहितेतील निर्णय:
. हुंडा पूर्णपणे बंद – कोणत्याही स्वरूपाचा हुंडा स्वीकारू नये किंवा द्यावा नये.
कर्ज काढून लग्न नको – गरजेपेक्षा जास्त खर्च करून, कर्जबाजारी होत लग्नसोहळे टाळावेत.
प्री-वेडिंग शूट बंद – समाजात वाढत्या फाजील खर्चावर रोक म्हणून फोटोशूट्सला नकार.
मुलीच्या आईची संसारात ढवळाढवळ नको – विवाहित जोडप्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप न करण्याचा आग्रह.
🔍 या निर्णयामागील हेतू:
समाजातील तरुण पिढीवर पडणारा आर्थिक बोजा कमी करणे.
विवाह म्हणजे दोन कुटुंबांचा सुंदर बंध, त्यात दिखाऊपणा नव्हे तर स्थिरता महत्त्वाची.
महिलांचा सन्मान राखत त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर, पण अति हस्तक्षेप टाळण्याचा संतुलित दृष्टिकोन.
या आचारसंहितेला तरुणवर्ग आणि प्रगतशील पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत, "हे पाऊल समाज सुधारण्याच्या दिशेने मोठे आहे," असे मत व्यक्त केले.
