चिंचणी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये अनोळखी इसमाचा सापडला मृतदेह परिसरात खळबळ!
शिरूर (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)-
रांजणगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या चिंचणी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ खळबळ उडाली,
याबाबत मासळी व्यावसायिक फिर्यादी- बाळासाहेब जगन कचरे वय 45 वर्ष राहणार चिंचणी तालुका शिरूर यांनी शिरूर पोलीस स्टेशन ला माहिती दिली, चिंचणी तालुका शिरूर जिल्हा पुणे धरणाच्या बॅकवॉटर मध्ये, चिंचणी गावचे हद्दीत धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेला राहणेस असून आमचे घराचे जवळ बॅकवॉटर मध्ये पाण्याचे मोटर आहेत तेथे मी येत जात असतो तारीख 13/5/25 रोजी 07/30 वा चे सुमा मी घरी असताना मला आमचे गावातील अनिल माणिक पवार यांचा फोन आला व त्यांनी मला सांगितले की पाण्यामध्ये एक बॉडी तरंगत आहे तेव्हा मी येऊन खात्री केली असता मला बॉडी पाण्यामध्ये दिसून आली तेव्हा रात्रीचे आठ वाजण्याची वेळ,पुरुष जातीची अनोळखी वय अंदाजे 40 ते 45 असून अंगावरील त्वचा पाण्यात गळून पडलेली दिसत असून जलचर प्राण्याने ठीक ठिकाणी कुरतडलेले दिसत आहे सदरची मयत बॉडी डीकंपोज झाल्याने दुर्गंधी सुटलेली आहे.
याबाबत अधिकचा तपास पोलीस हवालदार टेंगले व पोलीस हवालदार वाडेकर हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
.jpg)