शिरूरला दिवसाआड पाणी पुरवठा शिरूर नगर परिषदेचा निर्णय
शिरूर (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)-
शिरुर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा सध्या अत्यंत कमी प्रमाणात शिल्लक राहिल्याने शिरुर नगरपरिषदेने कठोर पण आवश्यक असा निर्णय घेतला आहे. गुरुवार, दिनांक १५ मे २०२५ पासून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे निवेदन नगरपालिकेने जाहीर केले.
सध्या शिरूर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर बंधाऱ्यातील पाणीसाठा मर्यादित असून, कुकडी पाटबंधारे विभागाकडे बंधारा पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. मात्र, तोपर्यंत उपलब्ध पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.
नवीन पाणीपुरवठा वेळापत्रकानुसार –
गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहील
शुक्रवारी आणि पर्यायी दिवशी पाणीपुरवठा सुरू राहील
अशी एक दिवसाआड पुरवठ्याची व्यवस्था पुढील सूचना होईपर्यंत लागू राहील.
पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा
नळधारकांनी नळांना तोट्या बसवाव्यात जेणेकरून पाणी वाया जाणार नाही.
विज मोटारींचा वापर करून अतिरिक्त पाणीसाठा करू नये.
पाणीपुरवठ्यात कोणत्याही तांत्रिक अडचणीमुळे वेळापत्रकात बदल होऊ शकतो, याची नोंद घ्यावी मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सर्व शिरुरकरांना सहकार्याचे आवाहन केले आहे.
