"म्हणजे वाघाचे पंजे” हा सामाजिक जाणिवा जागवणारा चित्रपट 30 मे ला प्रदर्षित होणार
डॉ. संतोष पोटे व डॉ. सुनीता पोटे यांची निर्मिती,
शिरूर :सुदर्शन दरेकर
कौटुंबिक करमणुकीचा परिपूर्ण अनुभव देणारा नवा मराठी चित्रपट ३० मे २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात साडेतीनशेहून अधिक चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. शिरूर येथील ऑक्सिगोल्ड चित्रपटगृहातही हा चित्रपट लागणार असून, शिरूरकर प्रेक्षकांसाठी हा एक विशेष आनंदाचा क्षण ठरणार आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “हा चित्रपट केवळ करमणुकीपुरता मर्यादित नसून, त्यामध्ये आजच्या समाजासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांवर भाष्य करणारा ठोस सामाजिक संदेशही आहे. त्यामुळे प्रेक्षक नक्कीच त्याला भरभरून प्रतिसाद देतील.”
उत्कृष्ट निर्मिती, भक्कम तांत्रिक बाजू आणि मातृत्वाची साथ
चित्रपटाची निर्मिती त्रिशूलीन सिने व्हिजन या बॅनरअंतर्गत निर्मला बांदेकर यांनी केली आहे. विशेष बाब म्हणजे चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या तमन्ना बांदेकर या त्यांच्या कन्या असून त्यांनी अभिनयासोबतच सहनिर्मात्याची भूमिकाही यशस्वीपणे निभावली आहे.
