प्रभू रामलिंग महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले

Dhak Lekhanicha
0

 प्रभू रामलिंग महाराज मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले 


विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन 

शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर 

शिरुर शहरापासून ३ कि . मी च्या अंतरावर प्रभू रामलिंग महाराज यांचे मंदिर आहे . प्रभू श्रीराम हे वनवासात असताना शिरुर परिसरात आले असताना येथील शिवलिंग ( पिंडीची ) स्थापना त्यानी केली असल्याची आख्यायिका रामलिंग मंदिरा संदर्भात सांगितली जाते .

लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असणाऱ्या शिरुर येथील श्री रामलिंग मंदिरातील पुरातन शिवपिंडीला वज्रलेप करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे  शुक्रवार दि. ९ मे पासून  मंदिर भाविकांसाठी खुले करण्यातआले आहे.


त्यानिमित्त  विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . होमहवन व प्राणप्रतिष्ठापना सोहळा , किर्तन  व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

वाघोली येथील वाघेश्वर तसेच सोमेश्वर मंदिरातील शिवपिंडींवर वज्रलेप करण्यात आला आहे . त्याच पध्दतीने  श्री.रामलिंग मंदिरातील शिवपिंडीवर वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.


काल दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संध्याकाळी कीर्तन सेवा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!