सरकारी नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ३३ लाखांची फसवणुक करणा-या महीला आरोपीस केले जेरबंद
शिरूर पोलिसांची मोठी कारवाई -संदेश केंजळे
शिरूर (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर )
शिरूर येथे शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून इंदापूर येथील महिलेने आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले असून, फिर्यादी विकास भिमराव नागरगोजे जोशीवाडी शिरूर ता. शिरूर जि पुणे यांनी फिर्याद दिली आहे , ऑगस्ट २०२३ पासून ते दि. ०४/०४/२०२५ रोजी अखेर पर्यंत महीला निशा लक्ष्मण शिंदे रा इंदापुर ता इंदापुर जि पुणे हीने फिर्यादी व त्यांचे ओळखीचे लोकांना मी मुलांना सरकारी नोकरी लावण्याचे काम करते. तुमच्याकडे कोणी विद्यार्थी असेल तर मला सांगा मी त्याला सरकारी नोकरी लावते. माझे वरपर्यंत ओळखी आहेत असा विश्वास देवून फिर्यादी व त्यांचे सहाकरी यांचेकडून फिर्यादी यांचे पत्नीचे एच.डी.एफ.सी. बँक शिरूरयावरून महीला निशा शिंदे यांचे एच.डी.एफ.सी. शाखा इंदापूर या अकाउंटवर २३,४६,०००/-रु. व रोख स्वरूपात १०,०००,००/- रू (अक्षरी दहा लाख) असे एकुण ३३,४६,०००/-रु. (अक्षरी तेहत्तीस लाख शेहचाळीस हजार) एवढी रक्कम घेवून फिर्यादी व त्यांचे सहकारी यांची आर्थिक फसवणुक केली आहे. फिर्यादीवरून गुन्हा दाखल करणेत आला असुन त्याचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर हे करीत आहेत.
सदर गुन्हयाची गंभीरता व संवेदनशिलता लक्षात घेता पोलीस निरीक्षक संदेश केंजळे , यांनी सदर गुन्हयातील महीला आरोपी निशा शिंदे हीचा शोध घेणेबाबत आदेश पोलीस हवालदार शिवाजी बनकर यांना दिले. सदर महीला आरोपी निशा शिंदे ही गुन्हा दाखल झालेपासुन पोलीसांना गुंगारा देत होती. महीला आरोपी निशा शिंदे ही इंदापुर येथे असलेबाबतची माहीत तांत्रीक विश्लेशनाद्वारे व गोपणीय बातमीदारामार्फत पोलीस हवालदार शिवाजी बनकर यांना प्राप्त झाल्याने सदरची माहीती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना देवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी बनकर, महीला पोलीस अंमलदार स्नेहल होळकर यांनी महीला आरोपी नामे निशा लक्ष्मण शिंदे रा इंदापुर ता इंदापुर जि पुणे हीस इंदापुर येथुन ताब्यात घेतले आहे. महीला आरोपी निशा शिंदे हिस न्यायालयासमोर हजर केले असता मा न्यायालयाने दिनांक ०८/०५/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी बनकर, महीला पोलीस अंमलदार स्नेहल होळकर, पोलीस अंमलदार विजय शिंदे यांचे पोलीस पथकाने केली आहे.
.jpg)