पालकांनी रागावल्याच्या कारणावरून घरातून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन दिल्या पालकांच्या ताब्यात; शिरूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे यश!
शिरूर :सुदर्शन दरेकर
दिनांक १६/०५/२०२५ रोजी व दिनांक १७/०५/२०२५ रोजी दोन अल्पवयीन मुली त्यांचे राहते घरातून कोणास काहीएक न सांगता निघून गेल्याची तक्रार शिरूर पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती, त्या तक्रारी वरून शिरूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपास केला असता , उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून शिरूर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व पोलीस अंमलदार यांचे तपास पथक तयार करून मुलींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. सदरच्या दोन्ही अल्पवयीन मुलींकडे कुठलाही मोबाईल नसल्याने व त्यांना कोणी नेले असावे व कशामुळे नेले असावे याबाबत पालकांना देखील माहिती नसल्यामुळे सदरचे गुन्हे उघड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. परंतु प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पो. स्टे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांचे आधारे सदरच्च्त्या दोन्ही मुलींचा शोध घेऊन दोन्ही मुली दिनांक १८/०५/२०२५ रोजी त्यांचे पालकांचे ताब्यात दिल्या आहेत. तसेच निघून गेलेल्या दोन्ही मुलींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे पालकांशी झालेल्या भांडणाचे किरकोळ कारणावरून रागाच्या भरात घरातून निघून गेल्याबाबत तपासात सांगितले असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी संदीप गिल पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, रमेश चोपडे अपर पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, प्रशांत ढोले उपविभागीय अधिकारी शिरूर विभाग, संदेश केंजळे पोलीस निरीक्षक व प्रभारी अधिकारी शिरूर पोलीस स्टेशन, शिरूर पो स्टे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार दीपक राऊत, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, सचिन भोई, नीरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील, रवींद्र आव्हाड, अशोक चितारे, महिला पोलीस अंमलदार गोदावरी धंदरे, महिला पोलीस अंमलदार कल्याणी कोडवते यांचे पथकाने केली आहे.
