शिरूरमध्ये कृषी केंद्रात घुसुन कोयत्याने मारहाण करणा-या तीन आरोपींच्या आवळल्या मुसक्या" शिरूर पोलीसांची दमदार कामगिरी
शिरूर प्रतिनिधी (सुदर्शन दरेकर )
दिनांक ०५/०४/२०२५ रोजी १४.०० वा चे. सुमारास मौजे शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे गावचे हद्दीत विशालकृषी सेवा केंद्र या दुकानांमध्ये फिर्यादी तसेच मालक शिवम शिंदे काम करीत असताना परवेज उर्फ पाप्या पठाण २. रुपेश चित्ते ३. ओंकार दत्तात्रय जाधव सर्व राहणार तरडोबाची वाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी संगणमत करून ओंकार जाधव हा फिर्यादी यांना म्हणाला की "तुला लय मस्ती आली आहे काय आमची तक्रार तहसील ऑफिसला करतो काय तुला आता दाखवतोच थांब" असे म्हणून त्या तिघांनी फिर्यादी यांना शिवीगाळ दमदाटी करून पाप्या पठाण याने हाताने तसेच दुकानांमधील कात्रीने फिर्यादी यांच्या उजव्या हातावर व पायावर मारहाण करून जखमी केले तसेच रुपेश वित्ते याने त्याचे हातातील कोयता दुकानासमोर फिरवून आजूबाजूचे परिसरातील दुकानांमध्ये दहशत निर्माण केल्याने त्यांनी त्यांची दुकाने बंद केली तसेच दुकानासमोर रोडवर असणारे इतर व्यक्ती देखील पळून गेले त्यानंतर उपस्थित त्याने दुकानांमध्ये येऊन फिर्यादी यांचे डोक्यात पाठीमागील बाजूस वार करून फिर्यादी यांना जखमी केले फिर्यादी तसेच मालक शिवम शिंदे यांनी आरडाओरडा केल्याने तिघेजण दुकानाचे बाहेर पळून जाताना देखील रुपेश चित्ते हा त्याचे हातातील कोयता फिरवत दुकानाचे बाहेर निघून गेला झालेप्रकाराबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे संतोष बाळू पाचरणे वय ४२ वर्षे व्यवसाय मजुरी राहणार जांभळी मळा तरडोबाची वाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे यांनी फिर्याद दिली असुन सदर बाबत गुन्हा नोंद केला असुन त्याचा पुढील अधिक तपास राजेंद्र साबळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सदर गुन्हयाची गंभीरता लक्षात घेवुन गुन्हयातील आरोपीतांना ताब्यात घेणेबाबत पोलीस पथक तयार केले. पोलीस पथकाने सदर गुन्हयातील आरोपी नामे १) परवेज उर्फ पाप्या अरलम पठाण वय १९ वर्ष, २) रूपेश राजु चित्ते वय २२ वर्ष, ३) ओंकार दत्तात्रय जाधव वय २६ वर्ष सर्व रा तर्डोबाची वाडी शिरूर ता शिरूर जि पुणे यांना गुन्हयाचे कामी अटक केली आहे. आरोपीतांकडुन सदर गुन्हयात वापरलेला कोयता जप्त करण्यात आला आहे.
तसेच मा पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगीतले आहे की, शिरूर शहरामध्ये व बाजारपेठेत घातक शस्त्रे, कोयता घेवुन दहशत करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याचेवर देखील प्रचलित कायदयान्वये कडक कारवाई करणार असल्याचे सांगीतले आहे.
सदरची कार्यवाही ही . पोलीस अधिक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक . संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे.
