भिवडी येथे श्री काळभैरवनाथ यात्रेला सुरुवात
कुडाळ प्रतिनिधी : भिवडी तालुका जावली जिल्हा सातारा येथील श्री काळभैरवनाथ देवाची यात्रा आजपासून सुरू होत असून, सकाळी ठीक नऊ वाजता वाजत गाजत श्री भैरवनाथ मंदिरापर्यंत दंडस्थान कार्यक्रम असून, त्यानंतर रात्री देवाचा छबिना व श्री भैरवनाथ मंदिरापासून आरती करून देवाचा छबिना संपूर्ण गावात ढोल ताशाच्या गजरात निघणार असून, देवाची पालखी प्रत्येक भाविकांच्या घरासमोर येत असते, नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी असणारे ग्रामस्थ पावणे या यात्रेत मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात, रात्रभर छबिना मिरवणूक पार पडल्यानंतर पालखी पहाटे मंदिरात पोहोचते दुसऱ्या दिवशी मुख्य यात्रेचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
यात्रा कमिटीने पंचक्रोशीतील भाविकांच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे यात्रा कमिटीने आवाहन केले आहे. गजानन बेलवडे कर व विशाल कुमार यांचा लोकनाट्य तमाशा ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी सादर होणार असून, दुसऱ्या दिवशी खास महिलांच्या आग्रहास्तव रंगीला ऑर्केस्ट्रा बारामती यांचा लावण्यांचा सदाबहार कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन ग्रामस्थ मंडळ भिवडी व यात्रा कमिटी यांनी केले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या श्री काळभैरवनाथ यात्रेचे थेट प्रक्षेपण शिवराज ग्राफिक्स ऑफिशियल या यूट्यूब चैनल वरून हेमंत चव्हाण यांच्या सौजन्याने होणार आहे अशी माहिती यात्रा कमिटीतील पदाधिकारी प्रमोद पवार विलास दरेकर राजकुमार दरेकर स्वप्निल महामुलकर सचिन दरेकर रवींद्र चव्हाण रत्नकांत जांभळे , अविनाश जाधव शुभम महामुलकर सागर भिसे किरण जाधव रामदास विधाते इत्यादी पदाधिकाऱ्यांनी श्री काळभैरवनाथ यात्रेची जोरदार तयारी केली असून तीन दिवस पार पाडणाऱ्या यात्रेत परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.
