अपहरणाची खोटी माहिती देऊन बनाव केल्याचा प्रकार उघडकीस, शिरूर पोलिसांकडून गुन्हा दाखल!
शिरूर :सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक )
दिनांक १०/०४/२०२५ रोजी सायंकाळी १६:३० वाजे सुमारास होनेवाडी टाकळी हाजी तालुका शिरूर जिल्हा पुणे गावचे इसम प्रसाद भानुदास देशमुख सध्या रा. नारायणगाव ता जुन्नर जि पुणे मुळ रा जाखुरी ता संगमनेर जि अहिल्यानगर याने त्यांचे कंपनीचे काम करणारे वरिष्ठ अधिकारी गौरव हारदे राहणार राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर यांना कॉल करून मला शेतकरी नवनाथ शंकर होणे यांनी तसेच इतर आठ व्यक्ती यांनी जबरदस्तीने डांबून ठेवले आहे, व पाच लाख रुपयांची मागणी करत आहे,असे स्वतः जाणीवपूर्वक खोटी माहिती देऊन त्याबाबत प्रसाद देशमुख काम करत असलेल्या कंपनीमधील पंकज शिंदे राहणार नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांनी डायल ११२ वर कॉल करून प्रसाद देशमुख याचे सांगणे वरून खोटी माहिती देऊन सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला आहे सदर बाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे संतोष सुभाष बनसोडे, पोलीस अंमलदार, शिरूर पोलीस स्टेशन यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन प्रसाद भानुदारा देशमुख सध्या रा. नारायणगाव ता जुन्नर जि पुणे मुळ स जाखुरी ता संगमनेर जि अहिल्यानगर याचे विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आवाहन केले आहे की, नागरीकांनी डायल ११२ क्रमांकाचा वापर हा आपत्कालीन स्थितीमध्ये करून खरी परीस्थितीबाबत माहीती दयावी. डायल ११२ या क्रमांकावर कॉल करून खोटी माहीती पुरवणा-या इसमांवर यापुढे देखील सरकारी यंत्रणेचा वेळ व संसाधनांचा गैरवापर केला म्हणुन त्यांचेवर प्रचलित कायदयान्चये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. खोट्या माहितीवर आधारित अशा प्रकारांबाबत सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
.jpg)