शिरूर ग्रामीणचे आदर्श सरपंच अरुणराव घावटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा रामलिंग येथे संपन्न

Dhak Lekhanicha
0

 शिरूर ग्रामीणचे आदर्श सरपंच अरुणराव घावटे यांचा अभिष्टचिंतन सोहळा रामलिंग येथे संपन्न 


शिरूर :सुदर्शन दरेकर (कार्यकारी संपादक )

शिरूर ग्रुप ग्रामपंचायत मधील आदर्श सरपंच व शिरूर पंचक्रोशीतील आदर्श व्यक्तिमत्व सर्वंसामान्य लोकांशी आपली नाळ कायम ठेवत तरुण नेतृत्वाची मोठी फळी उभी करणारे आदर्श सरपंच अरुण घावटे   आज वयाची 61वर्ष पूर्ण करत  आहेत. त्यानिमित्ताने रामलिंग येथे अभिष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला, त्यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे,शिरूर ग्रामीण सरपंच शिल्पा गायकवाड  पंचक्रोशीतील नेते शशिकांत दसगुडे सामाजिक कार्यकर्ते व क्रांतिवीर प्रतिष्ठान अध्यक्ष  संजय पाचंगे ,प्रथम लोकनियुक्त सरपंच विठ्ठल घावटे, उपसरपंच बाबाजी आण्णा वर्पे, शिवसेवा ट्रस्ट सदस्य  मनसुख गुगळे,मा.संजय शिंदे रासकर महाराज, सरपंच नामदेवराव जाधव, दादापाटील घावटे, मराठा महासंघाचे नेते नामदेव घावटे, विनय सिंधुताई सपकाळ,अमोल वर्पे, मा. सरपंच नितीन बोऱ्हाडे,भरत बोऱ्हाडे, 

 तुषार दसगुडे, यांच्यासह रामलिंग ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी अनेक मान्यवरांनी अरुणराव घावटे यांनी  पाणी योजना असेल गावातील  मंगल कार्यालय असतील या सर्वांपासून त्या ठिकाणी सर्व विकास करण्यामागे तात्यांचा खारीचा वाटा आहे.या ठिकाणी उपस्थित असलेले अनेक सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य घडवण्याचं काम  त्या  ठिकाणी त्यांनी केले  आज  राजकीय गोष्टी बोलायला काही हरकत नाही आज आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत आज शिरूर ग्रामीण जर पाहिली तर तालुक्याचे राजकारण हलवण्याची ताकद शिरूर ग्रामीणमध्ये आहे.उपसरपंच  अण्णांनी जे सांगितलं ते वस्तुस्थिती आहे शब्द जोपर्यंत देत नाही तोपर्यंत काही खरं नाही परंतु शब्द दिल्यानंतर ते कधीच मागे फिरत नाही त्यांचा आजपर्यंतचा इतिहास आहे कारण स्वर्गीय पाचर्णे  साहेबांच्या  मागे खंबीरपणे उभे राहण्याचे काम त्यांनी केलं मी ज्यावेळेस उपसरपंच झालो 2018 त्यावेळेस म्हणाले  आपल्याला पाचर्णे  साहेबांनी मदत केलेली आहे आपल्याला जास्त नाही पण साहेबांना मदत करावी लागेल आणि ह्या इलेक्शनला शेवटपर्यंत काही तात्यांनी मला शब्द दिला नाही, तात्पर्य माणसांनी ठाम राहणे महत्वाचे आहे.हे काम अरुण घावटे कायम करत असतात,असे तुषार दसगुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


राहुल पाचर्णे यांनी यावेळी बोलताना सांगिलते की, आपला वाढदिवस साधेपणाने साजरा व्हावा अशी इच्छा असतानाही गावातील कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार वाढदिवस साधेपणाने साजरा करा असे सांगितले   स्वर्गीय बाबुराव पाचर्णे यांचे खंदे समर्थक म्हणून तालुक्यात ओळखले जातात, अरुण घावटे यांनी अनेक कार्यकर्ते घडविले हे त्यांचे मोठेपण आहे.

क्रांतिवीर प्रतिष्ठानचे संजय पाचंगे यांनी अभिष्टचिंतन करताना अरुणराव घावटे यांनी तालुक्याचे नेतृत्व करावे पंचक्रोशी त्यांच्या मागे राहील अशी मला खात्री आहे.

 पंचक्रोशीतील नेते शशिकांत दसगुडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले व अरुणराव घावटे  यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना ते म्हणाले शिरूर ग्रामीण नगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यासाठी आमची काही हरकत नाही परंतु गावचे गाव पण टिकले पाहिजे सामान्य माणसांचे हित समोर ठेवून हा निर्णय घेण्यास हरकत नाही याची जबाबदारी मानसुख  शेठ गुगळे यांनी घ्यावी

 वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी जमलेल्या सर्व ग्रामस्थांचे आदर्श सरपंच अरुण घावटे यांनी आभार मानले.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!