शिरूर शहरातून पॅथॉलॉजी लॅब चालक बेपत्ता
शिरूर : सुदर्शन दरेकर( कार्यकारी संपादक)
शिरूर शहरात निर्माण प्लाझा जवळ निदान पॅथॉलॉजी लॅब चालक प्रवीण कैलास गावडे वय 26 वर्ष राहणार टाकळी हाजी हा तरुण बेपत्ता झाला असून शिरूर पोलीस स्टेशन येथे
किरण कैलास गावडे यांनी फिर्याद दाखल केली आहे याबाबत सविस्तर बातमी
दि. 01/04/2025 रोजी सकाळी 09:15 वाजता शिरूर प्रवीण कैलास गावडे वय 24 वर्षे, व्यवसाय-निदान पेंथालाजी लॅब, रा. टाकळी हाजी ता. शिरूर जि. पुणे उंची 166 सेंमी, अंगाने मजबुत, रंग सावळा, शिक्षण डी. एम. एल.टी. केस काळे, भाषा मराठी बोलतो, अंगात पांढरे रंगाचा शर्ट, काळे रंगाची पॅन्ट असा पोशाख परिधान केलेला आहे, त्याचा शिरूर परीसर व नातेवाइक यांचेकडे शोध घेतला असतो तो मिळुन आला नाही.
याबाबत अधिकचा तपास सहाय्यक फोजदार कदम व पोलीस हवालदार कदम हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत
