भिवडी येथे पंचांग वाचन आणि गुढीपाडवा उत्साहात साजरा,
शिरूर: (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर)
भिवडी तालुका जावली येथील हनुमान मंदिराच्या सभागृहात गुढीपाडव्यानिमित्त पंचांग वाचनाचा कार्यक्रम ग्रामस्थांच्या उपस्थित संपन्न झाला, पंचांगाचे वाचन चंद्रकांत दरेकर गुरुजी यांनी केले यावेळी सरपंच श्रीकांत निकम, उपसरपंच उमेश विधाते, माजी सरपंच मोहन जांभळे ,जनार्दन दरेकर, सूर्याजी विधाते, ज्येष्ठ नेते बबन चव्हाण, यात्रा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद पवार, मंदिर कमिटीचे अध्यक्ष रामदास दरेकर, शत्रुघ्न विधाते, प्रकाश चव्हाण संतोष विधाते, सर्जेराव दरेकर, शत्रुघन चव्हाण, विलास दरेकर उद्योजक राजकुमार दरेकर, विजय चव्हाण संजय दरेकर विकास मामुलकर किसन चव्हाण उद्योजक पुंडलिक माहुलकर अभिजीत मामुलकर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते .यावेळी गावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवाची यात्रा 16 व 17 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पाडण्याचे बैठकीत ठरवण्यात आले, देवाचा गोंधळ, व दुसऱ्या दिवशी देवाचा छबिना होणार आहे. त्यानंतर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील पै पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे यात्रा कमिटी सदस्यांनी सांगितले.
दरवर्षी गुढीपाडव्याला चैत्र महिना सुरू होतो मराठी वर्षाची सुरुवात या दिवसापासून होते पंचांगवाचन गणपती पूजन या गोष्टी दरवर्षी आपण करतोच यावर्षी गुढीपाडवा रविवारी आल्यामुळे राजा रवी असणार आहे धान्य फुले फळे कमी पिकतील महागाई वाढेल रोगराई आणि चोर यामुळे लोकात भीती निर्माण होईल
मेघाधीपती रवी आहे त्यामुळे पाऊस कमी पडणार आहे धान्य आणि फुले कमी मिळतील चोर उंदीर रोगराई यापासून लोकांना त्रास होईल,
खरीप पिकांचा स्वामी बुद्ध असल्याने पाणी विपुल प्रमाणात मिळेल धनधान्य संपत्ती वाढेल लोक सुखी समाधानी राहतील.
रब्बी पिकांचा स्वामी चंद्र असल्याने पाऊस चांगला पडून दूध फुले फळे यांची समृद्धी होईल लोकांची संपत्ती वाढेल
निरसांचा अधिपती बुध असल्याने पाचू वगैरे रत्ने विपुल प्रमाणात मिळतील कडधान्य देखील विपुल पिकतील
आद्र्रा नक्षत्र प्रवेश 22 जून 2025 रोजी सकाळी सहा वाजून 19 मिनिटांनी सूर्य आद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे त्याचे फळ लोकांमध्ये सुख समाधान जनावरांना त्रास रोगराई वाढेल यावर्षी निलक नावाचा मेघ असल्याने पाऊस चांगला पडेल रनदान्य मुबलक होईल लोक आनंदी राहतील यावर्षी वासूकी नावाचा नाव असल्याने पर्जन्यमान चांगले राहील पिके चांगल्या पद्धतीने येतील पशुपालक यम आहे म्हणून पाऊस थोडा कमी पडण्याची शक्यता आहे गवत चारा कमी येईल जनावरांना त्रास होईल यावर्षी मेघ निवास परिटाचे घरी असून रोहिणी नक्षत्र ताटावर पडले आहे त्यामुळे पाऊस पुष्कळ असणार आहे धनधान्य समृद्धी राहील दोन अडक म्हणजे पर्जन्यमान साधारण सहा भाग नद्या व पर्वत यावर आणि चार भाग भूमीवर याप्रमाणे इंद्र पर्जन्य वर्षाव करणार आहे.
