शिरूर तालुक्यातील निमोणेच्या सरपंचपदी राजश्री संदीप गव्हाणे यांची निवड
निमोणे (ता.शिरूर)- पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या एका महत्त्वाच्या व लोकसंख्येने मोठे असणाऱ्या, निमोणे गावच्या सरपंचपदी राजश्रीताई संदीप गव्हाणे यांची, सोमवार दि. 25 मार्च 2025 रोजी बिनविरोध निवड करण्यात आलीय. यावेळी गावातून भव्य मिरवणूक काढत, तिचा समारोप ग्रामदैवत नागेश्वर मंदिरात झाला. यावेळी झालेल्या सत्काराच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत, गव्हाणे कुटुंबीयांचे प्रमुख कैलासवासी अर्जुन नामदेव गव्हाणे यांचे सरपंच पदाचे स्वप्न त्यांच्या सूनबाई राजश्रीताई संदीप गव्हाणे यांच्या स्वरूपात पूर्ण झाल्याने, त्यांना खऱ्या अर्थाने हीच श्रद्धांजली ठरेल असे मत व्यक्त केले. यावेळी माजी सरपंच शामभाऊ काळे, माजी सरपंच संजय काळे, माजी सरपंच सुषमा भाऊसाहेब काळे, सदस्या लीलाबाई दिलीप काळे, स्वाती गायकवाड, लता ताठे, पार्वती सुर्यवंशी, उपसरपंच प्रशांत अनुषे, पांडुरंग हिंगे, सुरेश कोल्हे, भरत गव्हाणे, कांतीलाल गव्हाणे, अनिल गव्हाणे, शशीभाऊ गव्हाणे, राहुल ब्राम्हने, बापूसाहेब जाधव, प्रतीक गिरे, दिलीप गव्हाणे, एकनाथ गव्हाणे, उत्तम हिंगे, अंकुश जाधव, अमोल थोरात, व डेअरीचे चेअरमन संदीप गव्हाणे, सुभाष गव्हाणे, अनिल गव्हाणे आदी मान्यवर, तसेच गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, तसेच गव्हाणे परिवारावर प्रेम करणारे तालुक्यातील मित्रमंडळी व निमोणे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा नेते राहुल पवार यांनी केले, तर सर्वांचे आभार नूतन सरपंच राजश्री संदीप गव्हाणे यांनी मानले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महसुल विभागाचे मंडलाधिकारी नंदकुमार खरात व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्राम पंचायत अधिकारी बाळासाहेब शेळके यांनी काम पाहिले.
