शिरूर शहर आणि परिसरात मंगळसूत्र चोरीच्या घटना उघडकीस परराज्यातून गुन्हेगारांना केले जेरबंद

Dhak Lekhanicha
0

 शिरूर शहर आणि परिसरात मंगळसूत्र चोरीच्या घटना उघडकीस परराज्यातून गुन्हेगारांना केले जेरबंद,


 शिरूरच्या गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई!

शिरूर : सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक)

 शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसात चोरीच्या अनेक घटना घडल्या होत्या महिलांच्या अंगावरील दागिने चोरणारी टोळी सक्रिय झाल्याची विश्वसनीय माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली होती त्या अनुषंगाने तपासाची चक्र फिरवून परराज्यातून गुन्हेगारांना अटक झाली आहे . सदर गुन्ह्याची हकीकत अशी कि, यातील फिर्यादी या दिनांक २६/०१/२०२५ रोजी रात्री 9 वा. चे सुमारास जोशीवाडी शिरूर ता. शिरूर जि. पुणे गावच्या हद्दीत हनुमान मंदिर ते जुन्या हायवेवर असलेल्या गणेश दुध डेअरीच्या समोरून पायी जात असताना दोन अनोळखी इसमांनी स्कूटीवरून येवुन त्यातील मागच्या इसमाने फिर्यादी यांचे गळयातील २७,८४०/- रू किमतीचे ७.९३० ग्रॅम वजनाचे मिनी मंगळसुत्र जबरदस्तीने ओढुन चोरी करून चोरून नेले असल्याने सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा तपास पोसई शुभम चव्हाण हे करत आहेत.

सदर गुन्ह्यावी गंभीरता लक्षात घेवुन तसेच मागील काळात शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत अशाच प्रकारे घडलेल्या गुन्हयांमधील आरोपी एकाच टोळीतील असल्याचे पो नि संदेश केंजळे, यांनी तपास पथकाला आदेशित केल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोसई श्री. शुभम चव्हाण व अंमलदार हे यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितेश थोरात व विजय शिंदे यांनी सीसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषनाचे आधारे सदर गुन्हयातील आरोपीतांचा सुगावा काढुन सदरचे आरोपी हे अहिल्यानगर परिसरातील असल्याचे निष्पन्न केले.

सदरबाबत पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पोसई शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ यांचे एक पथक तयार करून अहील्यानगर येथे जावुन आरोपीत यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तपास पथकाने रवाना होवुन अहिल्यानगर येथुन आरोपी १) गणेश सुनील गायकवाड, वय २१ वर्ष, रा. सारसनगर, शांतीनगर, सोलापुर रोड, अहिल्यानगर ता जि अहिल्यानगर २) करण नरसी वाघेला, वय २४ वर्ष, रा. संजयनगर, काटवन खंडोबा, स्टेशन रोड, अहिल्यानगर ता.जि अहिल्यानगर यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता सदर आरोपींनी त्यांचा साथीदार ३) साजीद सलीम शेख, रा. अहिल्यानगर, ता.जि अहिल्यानगर ) यावेसोबत मिळून सदरचा गुन्हा व शिरूर पोलीस स्टेशन ह‌द्दीत आणखी काही गुन्हे केल्याची कबुली दिल्याने त्यांना गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली असुन साजीद सलिम शेख हा अद्याप फरार आहे. आरोपींकडे पोलीस कस्टडीत केलेल्या तपासात आरोपीतांनी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख स. अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोसई श्री. शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार विजय शिंदे, नितेश थोरात, निरज पिसाळ, सचिन भोई, रविंद्र आव्हाड, निखील रावडे, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!