बोऱ्हाडे मळा येथे चार चाकी गाडीत झोपलेल्या महिलेच्या अंगावरील दागिने चोरीला
शिरूर :सुदर्शन दरेकर ( कार्यकारी संपादक)
शिरूर शहराजवळील पुणे अहिल्यानगर हायवे ला हॉटेल कल्याणी जवळ फिर्यादी सुलोचना दुधाराम राठोड (वय 40 वर्ष व्यवसाय मजुरी रा. उत्तरवाडोना , ता. नेर जि. यवतमाळ)यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली असून फिर्यादी यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात इसमान विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
03/04/2025 रोजी पहाटे 4:00 वा चे सुमारास शिरूर ग्रामीण तालुका शिरूर, जिल्हा पुणे. येथे फिर्यादी चार चाकी गाडीत झोपले असताना त्यांच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची घटना घडली असून,
३५०००/- एक पाच ग्राम वजनाचे गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र खालील बाजूस दोन ३५०००/-एक पाच ग्राम वजनाचे गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र खालील बाजूस दोन वाट्या असलेल्या त्यामध्ये काळे मणी असलेले जुवा
३५०००/-एक पाच ग्राम वजनाचे गळ्यामधील सोन्याचा गंठण त्याला खालील बाजूस पदक असलेली त्यामध्ये काळे मणी असलेले जुवा की अं.
२१०००/-तीन ग्रॅम वजनाचे दोन्ही कानामधील दोन सोन्याच्या गोलाकार रिंगा असा एकूण 91 हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला असून माझी त्यांच्याविरुद्ध तक्रार आहे,
पहाटे साडेचारचा सुमारास पुणे अहिल्यानगर रस्त्यावर शिरुर जवळील बो-हाडे मळा येथील कल्याणी हॉटेल समोर अहिल्यानगर पुणे रोडचे पुणे बाजूला सुलोचना राठौड यांचा चुलत भाऊ यास झोप लागल्यान त्यांनी त्यांची चार चाकी गाडी क्र . एम. एच. ३७ ए .डी .८९०७ थांबवून गाडी मध्ये झोपलेले असताना दोन अनोळखी इसमांनी आवाज देऊन गाडीचा दरवाजा उघडण्यास सांगितला व त्यातील एकाने चाकूचा धाक दाखवून राठोड यांच्या गळ्यामधील सोन्याचे मणी मंगळसूत्र व कंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले व भीतीने राठौड यांनी कानातील रिंगाही काढून दिल्या.
याबाबत अधिकचा तपास नकाते व पोलीस हवालदार मोरे हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
.jpg)