सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार म्हणजे त्यांच्या कार्याची पावती!प्रामाणिक सेवावृत्ती हेच कर्तव्य पूर्तीचे समाधान-बाळासाहेब पडवळ
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री गुरुदेव दत्त माध्यमिक विद्यालय सविंदणे तालुका शिरूर येथील मुख्याध्यापक शारदा मिसाळ यांच्या सेवापुर्ती कार्यक्रमानिमित्त भव्य नागरी सत्कार!
शिरूर : सुदर्शन दरेकर( कार्यकारी संपादक)
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या श्री गुरुदेव दत्त विद्यालय सविंदणे तालुका शिरूर येथील प्राचार्या शारदा मिसाळ यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त ग्रामस्थ व विद्यालयाने भव्य नागरी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मनीषा नरवडे, माजी प्राचार्य वाघोली नानासाहेब निंबाळकर उद्योजक कैलास पडवळ विठ्ठल मिंडे, माजी सरपंच देवराम दादा मिंडे भाऊसाहेब लंगे शुभांगी पडवळ भोलेनाथ पडवळ ग्रामपंचायत सदस्य मालुताई मिंडे नंदाताई मिंडे सचिव बाळासाहेब पडवळ अर्जुन लंघे, बाळासाहेब भोर, पत्रकार अरुण मोटे, पत्रकार सुदर्शन दरेकर, सुनील शिंदे, दत्तात्रय घाडगे, मेजर नाथू पारधी शेलगाव चे माजी मुख्याध्यापक भारत कांबळे, दिलीप गिरंजे , माधव शितोळे, डॉ. दत्तात्रय बोबडे प्रा. ससाने सर,प्रा. बाळासाहेब नान्नोर जालिंदर घाडगे, भरत शेठ पडवळ परशुराम नरवडे, पोपट पडवळ इंद्रभान कळमकर, आर के ठाकूर करडे नावरे इनामगाव उरळगाव येणारे मोशी चारोली मांडकी निमगाव केतकी विद्यालयाचे प्राचार्य मुख्याध्यापक अनेक अध्यापक यावेळी उपस्थित होते. या सत्कार समारंभात मिसाळ परिवारांचे स्नेही मुलगी डॉक्टर सायली मिसाळ -जगताप जावई मंदार जगताप बहिण गिरीजा गायकवाड,मंगल वाघमारे, आई विजया मिसाळ, रमेश मिसाळ, शुभांगी मिसाळ, अजिनाथ जाधव, दिलीप मिसाळ, रवींद्र मिसाळ, दयानंद वाघमारे, गौरव मिसाळ यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विद्यालयाने केलेल्या आव्हानानुसार गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना 500 वह्या मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या,
शारदा मिसाळ यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य सविंदणे या गावात सर्वात जास्त काळ सेवा केली याचा ग्रामस्थांना खूप अभिमान आहे. श्री गुरुदेव दत्त विद्यालयात 14 वर्ष सेवा केल्यानंतर इनामगांव आणि करडे याठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कामकाज केले आपल्या सेवानिवृत्तीला एक वर्ष शिल्लक असताना पुन्हा सविंदणे या गावात मुख्याध्यापिका म्हणून त्यांना संधी मिळाली, त्या संधीचे सोने करून विद्यालयाला पायाभूत सुविधा सीएसआर फंडाच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात त्यांचा मोठा सहभाग राहिला, विद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी भरीव मदत निधी ग्रामस्थ्यांच्या सहकार्यातून मिळवून दिला, सौर ऊर्जा पॅनल डिजिटल झेरॉक्स मशीन, विद्यालयाच्या मैदानात कच, खडी टाकून संपूर्ण मैदान सुशोभित करण्यात आले. संपूर्ण विद्यालयास सीसीटीव्ही कॅमेरे, साऊंड सिस्टिम, स्वागत कमान सुशोभीकरण स्लाइडिंग गेट, बोलक्या भिंती त्यांची रंगरंगोटी इत्यादी महत्त्वाची कामे करण्यासाठी आजी-माजी विद्यार्थ्यांकडून मोठा मदत निधी मिळाला.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.आज प्रामाणिकपणा जेवढा शिल्लक आहे, त्याच बळावर जगाचे रहाटगाडगे सुरू आहे. शासकीय सेवेत सचोटीने कार्य करत राहणे ही प्रामाणिक सेवावृत्ती जोपासल्यास प्रत्येकाला कर्तव्यपूर्तीचे समाधान लाभते. हेच समाधान सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य सुखकर करून जाते, असे प्रतिपादन शारदा मिसाळ यांनी केले.
मिसाळ दांपत्याने ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना हजारो विद्यार्थी घडविले, त्यांना यशाचा मार्ग दाखवला, कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देऊन सर्व घडे एकसारखे बनवतो त्याप्रमाणे आपल्या कार्यकाळात या दांपत्याने अनेक हिरे घडविले आज अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उच्च पदावर नोकरी व्यवसाय करत आहेत. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या अध्यापकांबरोबर बाळासाहेब पडवळ सचिव यांचे मोलाचे योगदान लाभले, प्रस्ताविक रवींद्र पैलवान सूत्रसंचालन सुलक्षणा दुसाने व योगेश दुसाने यांनी केले.


