निमोने येथील महिला शिरूर मधून बेपत्ता
शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
निमोणे तालुका शिरूर येथील महिला पूजा राजेंद्र चव्हाण वय वर्ष 27 ही महिला न्यायालयीन कामकाजासाठी शिरूर येथे आली असता बेपत्ता झाल्याची फिर्याद राजेंद्र ज्ञानेश्वर चव्हाण राहणार निमोणे तालुका शिरूर यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली असून याबाबत सविस्तर वृत्त,
दिनांक 28/03/2025 रोजी शिरूर कोर्ट येथे माझे मुलीचे फौजदारी प्रकरणात तारीख आहे असे सांगुन सकाळी दरम्याण निमोणे गावचे हद्दीतील राहते घरातुन निघुन गेली आहे. रंग गोरा, केस काळे, चेहरा गोल नाक सरळ, नेसनीस गुलाबी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेंगीन, पायात काळ्या रंगाची चप्पल, गळ्यामध्ये
चांदीची चैन, उजव्या हातावर पुजा नाव गोंधलेले असुन,
याबाबत अधिकचा तपास पोलीस हवालदार गवळी हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
