शिरसगाव काटा येथील अपघात प्रकरणी शिरूर पोलिसांची मोठी कारवाई,चालकाच्या आवळल्या मुसक्या

Dhak Lekhanicha
0

 शिरसगाव काटा येथील अपघात प्रकरणी शिरूर पोलिसांची मोठी कारवाई,चालकाच्या आवळल्या मुसक्या


 शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाची धडाकेबाज कारवाई

शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर 

 शिरसगाव काटा ता शिरूर जि पुणे गावचे ह‌द्दीत तळयाजवळ अज्ञात टेम्पोवरील अज्ञात चालकाने रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून हयगयीने व अविचाराने भरधाव वेगात त्याचे ताब्यातील टेम्पो चालवुन समोरून येणारे मोटारसायकलवरील चालक  करणसिंग ग्यारसिंग जमरे वय ४९ वर्ष रा. बडवाणी जि राजपुर राज्य मध्यप्रदेश यास ठोस देवुन त्याचे मृत्युस कारणीभुत झाला तसेच अपघातामध्ये टिकम जमरे याचे गंभीर दुखापतीस कारणीभुत होवुन अपघाताची खबर न देता पळून गेला होता. सदर बाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हयाची गंभीरता व संवेदनशिलता लक्षात घेता पोलीस निरीक्षक मा. संदेश  केंजळे  यांनी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी अपघातातील अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार नितेश थोरात, रविंद्र आव्हाड यांना शिरसगाव काटा, पिंपळसुटी, निर्वी, तांदळी, काष्टी परीसरामधील सुमारे ५० पेक्षा अधिक सी सी टी व्ही फुटेज कसोशीने तपासुन पडताळून तांत्रीक दृष्टया तपास करीत असताना सदर अपघातामधील वाहन हे अशोक लेलंड कंपणीचा टेम्पो कं एम एच २५ ए जे ७६३७ यावरील चालकाने केले असल्याचे प्राथमिक दृष्ट्या स्पष्ट झाले.


पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे, यांनी सदर गुन्हयातील वाहन व चालक यांना ताब्यात घेणेबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार रविंद्र आव्हाड यांचे पथक तयार करून वारे वडगाव ता भुम जि धाराशिव येथे जावुन  वारे वडगाव ता भुम जि धाराशिव येथे जावुन अपघातातील वाहन अशोक लेलंड कंपणीचा टेम्पो कं एम एच २५ ए जे ७६३७ यास ताब्यात घेवुन चालक प्रितेश राजेंद्र गायकवाड रा वारे वडगाव ता भुम जि धाराशिव याने सदरचा अपघात केल्याचे कबुली दिल्याने त्यास गुन्हयाचे  ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम हे करीत आहेत.


सदरची कार्यवाही ही  पोलीस अधिक्षक .  पंकज देशमुख ,  अप्पर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत ढोले  मा. पोलीस निरीक्षक . संदेश केंजळे  यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक  शुभम चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार नितेश थोरात रविंद्र आव्हाड यांचे पोलीस पथकाने केली आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!