शिरूर सिटी बोरा कॉलेज समोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

Dhak Lekhanicha
0

 शिरूर सिटी बोरा कॉलेज समोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले 


 शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर 

 शिरूर शहरात चोरीच्या घटना   मोठ्या प्रमाणावर घडताना दिसत आहेत, शहर परिसरात मोटर सायकल  चोर मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसत आहे. शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चोरीच्या घटनां उघडकीस आणून आरोपींना शिक्षाही होत आहेत परंतु शहर परिसरात पोलीस ग्रस्त वाढवणे गरजेचे आहे,

 शिरूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कॉलेज रोड समोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे मगर हॉस्पिटल कडून पसार झाल्याची तक्रार फिर्यादी 

 नंदा राजाराम घोलप (वय 58 वर्ष व्यवसाय गृहिणी रा. गुजर मळा शिरूर) यांनी पोलीस स्टेशन येथे दिली आहे 

 याबाबत सविस्तर वृत्त,

                  18/03/2025 रोजी सायंकाळी 19/45 वाचे सुमारस मौजे शिरूर ता शिरूर जि पुणे गावचे हद्दीत सिटी बोरा कॉलेजचे समोरून रोडने चालत जात असताना दोन अनोळखी इसमांनी एका काळ्या रंगाच्या स्कुटी गाडीवरून येवुन गळ्यातील  सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून मगर  हॉस्पीटल बाजुकडे स्कुटी वरून पळून गेले. याबाबत आधीचा कपास सहायक पोलीस निरीक्षक कारंडे हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!