बाबुराव नगर शिरूर येथे मॉर्निंग वॉक साठी गेलेला युवक बेपत्ता
शिरूर : सुदर्शन दरेकर
शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीत बाबुराव नगर येथील युवक जांभळी मळा येथे मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडला असता अद्याप घरी न आल्यामुळे फिर्यादी संदीप शिवाजी खामकर वय वर्ष 35 राहणार टाकळी हाजी यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार बाबुराव नगर परिसरात राहणारा युवक मंगेश बबन खामकर वय वर्ष 28
हा नेहमीप्रमाणे जांभळी मळा येथे मॉर्निंग साठी गेला असता अद्याप पर्यंत घरी न आल्यामुळे कुटुंबीयांच्या काळजीत भर पडली असल्याने तक्रार दाखल करण्यात आली असून, सदर युवकाचे वर्णन खालीलप्रमाणे असून कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याची विनंती पोलिसांना केली असल्याचे सांगितले.
रंगाने गोरा, डोळे काळे चेहरा गोल, नाकसरळ, केस काळे, अंगात पांढरे रंगाचा फुलबाहयावा शर्ट पांढरे रंगाची फुल पन्ट, पायात स्लीपर चप्पल, भाषा मराठी, हिंदी भाषा अवगत.
सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार टेंगले व पोलीस हवालदार कोथळकर हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
