आंबळे येथे विवाहितेचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
शिरूर : महिलेच्या घरात जाऊन महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चंद्रकांत अनुसे याच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंबळे ता. शिरूर जि.पुणे येथे फिर्यादी राहत असलेल्या ठिकाणी चंद्रकांत अनुसे (रा.अनुमेवाडी, कळवंतवाडी ता. शिरूर जि.पुणे )याने फिर्यादी महिलेच्या घरामध्ये अनधिकृत पणे प्रवेश करून त्या महिलेचा हात धरून, जवळ येऊन त्या महिलेच्या गालावर हात फिरवून "तु मला खुप आवडतेस" असे म्हणून त्याने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच त्या महिलेचा पती व तीला धक्काबुक्की करून शिवीगाळ,दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली.
यावरून त्या महिलेने शिरूर पोलीस स्टेशन येथे चंद्रकांत अनुसे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस हवालदार आगलावे व पोलीस हवालदार भोते हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
