माऊली गव्हाणे या युवकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, दाणेवाडी परिसरात तणावपूर्ण शांतता

Dhak Lekhanicha
0

 माऊली गव्हाणे या युवकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार


 दाणेवाडी परिसरात तणावपूर्ण शांतता 

 शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर 

 अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व शिरूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या दाणेवाडी येथील युवक माऊली गव्हाणे हा 7 मार्चपासून बेपत्ता होता. हा तरुण शिरूर येथून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत होते, श्रीगोंदा पोलिसांनी तपासाची सूत्रे आपल्या हाती घेतली व परिसरात शोध मोहीम राबवताना आरोपींनी परिसरातील विहिरीमध्ये माऊली गव्हाणे याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून दोन गोण्यांमध्ये भरून विहिरीमध्ये टाकून देण्यात आले होते.

 माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. दरम्यान काल आरोपी अटक करण्यात आला असून अहिल्या नगर जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर पोलिसांनी आरोपीस पोलीस कोठडी सुनावली आहे. आज मयत माऊली गव्हाणे यांच्या मूळ गावी दाणेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारो नागरिक उपस्थित होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश दिसून येत होता. मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नातेवाईक करताना दिसत आहेत.

 अहिल्यानगर पोलिसांसमोर सदर गुन्ह्याचा तपास करण्याचे मोठे आव्हान असून इतर आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!