जांबुत येथे गांजा विक्री करणाऱ्या इसमास अटक, शिरूर पोलिसांची कारवाई

Dhak Lekhanicha
0

 जांबुत येथे गांजा विक्री करणाऱ्या इसमास अटक, शिरूर पोलिसांची कारवाई 


शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर 

शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार  अंबादास थोरे यांना विश्वसनीय माहिती मिळाली की, समिर हजरतअली शेख वय ३० वर्षे रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे हा त्याचे राहते घराचे अवतीभोवती परिसरात गांजा अंमली पदार्थ बाळगुन त्याची ओळखीचे लोकांना विक्री करीत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने छापा कारवाईबाबत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी  शिरूर उपविभाग शिरूर यांची परवानगी घेवुन बातमी मिळाले ठिकाणी छापा टाकण्याकरिता शिरूर पोलीस स्टेशनचे पथक तयार करून मौजे जांबुत ता. शिरूर जि.पुणे येथील आरोपी यांचे राहते घरी सापळा रचुन छापा टाकला असता त्या ठिकाणी नामे समिर हजरतअली शेख वय ३० वर्षे रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन ३ किलो ८४० ग्रॅम तयार वजनाचा गांजा असा एकुण ३८,८४०/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी नामे समिर हजरतअली शेख वय ३० वर्षे रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे याचे विरूध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६९/२०२५ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २०,२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


सदरची कारवाई  पोलीस अधीक्षक , पुणे ग्रामीण  पंकज देशमुख,.अपर पोलीस अधीक्षक  पुणे विभाग,  रमेश चोपडे व उपविभागीय पोलीस अधिकारी , शिरूर उपविभाग . प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन,  संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनचे  सहायक पोलीस निरीक्षक  दिपक करांडे, पो.हवा भागवत गरकळ, बाळु भवर,  अंबादास थोरे,  भाऊसाहेब ठोसरे यांचे पथकाने केली असुन सदर गुन्हयामध्ये आरोपी  समिर हजरतअली शेख वय ३० वर्षे रा. जांबुत ता. शिरूर जि. पुणे यास अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शानाखाली सहायक पोलीस निरीक्षक, श्री. दिपक करांडे हे करीत आहेत.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!