रामलिंग येथे पार्किंग मध्ये लावलेली हिरो होंडा मोटरसायकल चोरीला गुन्हा दाखल
शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
वृषाल बाळासाहेब टेमगिरे, (वय 32 वर्षे, व्यवसाय शेती रा. निमगाव भोगी ता. शिरूर जि. पुणे)
दि 26/02/2025 रोजी रात्री रामलिंग गावचे हददीत अण्णापुर बाजुला गोकळ्या जागेतील पार्किंग मध्ये असलेली निळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने लंपास केली असून फिर्यादी वृषाल बाळासाहेब टेमगिरे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त मौजे रामलिंग येथे अन्नापूर बाजूला पार्किंग मध्ये अज्ञात चोरट्याने हिरो होंडा मोटरसायकलचे लॉक तोडून स्वतःच्या आर्थिक फायदा करता चोरी करून माझे आर्थिक नुकसान केले असून माझी अज्ञात चोरट्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.
याबाबत अधिकचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार साबळे व फौजदार कदम हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
