घडवूया करुणामय जग, या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल,
सत्यार्थी मुव्हमेंट फॉर ग्लोबल कम्पॅशन च्या सह संस्थापक- सुमेधा कैलाश
शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर
कर्डेलवाडी गावामध्ये बालचौपाल आणि समुदाय बैठक यामध्ये ग्रामस्थ आणि मुलांनी पुष्पवर्षाव करून स्वागत केले या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमेधा कैलाश म्हणजेच आदरणीय माताजी यांनी विविध गोष्टींवर चर्चा केली विशेष करून माताजींनी बालपंचायतीच्या सदस्यांची भेट घेऊन ते करत असलेल्या कामाचा आढावा घेतला बाल सरपंच गणेश बिहारी जाधव आणि निर्वि गावची बाल सरपंच महा बाल पंचायत सदस्य सानवी यांचा सन्मान आदरणीय माताजी यांनी केला. गावासाठी आणि मुलांसाठी करत असलेल्या कामासाठी बाल सरपंच गणेश बिहारी जाधव याला माताजींनी आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात माताजी यांनी बालकांच्या संरक्षणासाठी काही गोष्टींवर चर्चा केली त्या म्हणाल्या करुणा म्हणजे दया नाही तर ती एक स्वाभाविक गोष्ट आहे आणि बाल हक्कांवर घोषणा देताना त्यांनी सांगितले की बंद मूठ म्हणजे एकजूट असा याचा अर्थ आहे चुकीच्या गोष्टींना विरोध केलाच पाहिजे बालपंचायतीच्या मुलांच्या माध्यमातून त्यांच्या मध्ये नेतृत्व गुण विकसित करून मुलांनी आणि एकूणच गावाने आपल्या समस्या मांडून त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्याचप्रमाणे आजच्या डिजिटल युगामध्ये मुलांना मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे तसेच आपल्या गावातील मुले शोषणमुक्त असली पाहिजेत असे त्यांनी आपल्या वक्तव्यामधून सांगितले
आदर्श ग्राम कर्डेलवाडीच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच लताताई गणेश कर्डिले यांनी आपले गाव आदर्श ग्रामआणि तंटामुक्ती गाव अभिमानाने माताजींना सांगितले त्यानिमित्ताने त्यांनी विशेष करून सरपंच लताताई यांचे आणि त्या करत असलेल्या कार्याचे कौतुक केले .
त्याचप्रमाणे गावात राबविले जाणारे विविध उपक्रम यांची माहिती कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्य किशोर कारभारी कर्डिले यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी उपसरपंच सारिका धरणे,तसेच ग्रामंचायत सदस्य अनिता दसगुडे,संगीताताई दसगुडे, उच्चशिक्षित युवक प्रकाश कऱ्हे सर,सामाजिक कार्यात हिरीरीने सहभाग घेणारे गणेश दादा कर्डिले ,महिला मंडळाच्या अध्यक्ष सपना कर्डिले सह महिला मंडळातील सर्व महिला आणि युवा मंडळातील तरुण त्याचप्रमाणे वृद्ध, ग्रामस्थ, मुले, शाळेतील शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनचे डायरेक्टर राकेश शेंगर सर वरिष्ठ प्रकल्प अधिकारी फैज अहमद, जेसली , सपना यादव आणि शिरूर येथील कैलाश सत्यार्थी चिल्ड्रन्स फाउंडेशनची संपूर्ण टीम सहभागी होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गावातील सामाजिक उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पाडणारे कार्यकर्ते तुषार दसगुडे यांनी केले. आभार प्रदर्शन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अनिल यशवंत यांनी केले.
.jpg)