उसतोड मजुर पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीस अटक करण्यास रांजणगाव एमआयडीसी पोलिसांना आले यश
शिरूर (प्रतिनिधी)- रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गणेगाव खालसा येथे दि. 11/02/2025 रोजी रात्री ऊस तोडणी करिता आलेला कामगार माऊली उर्फ ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे (रा.दडपिंपरी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव)यांनी त्याची पत्नी मिनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे( वय 27 वर्ष) हिचा नाशिक येथे त्यांचे नातेवाईकांचे लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून तिला रस्सीने लोखंडी बाजेला बांधून गळा आवळून तिला जीवे ठार मारून खून केला होता. त्यावरून मयताचा भाऊ ताराचंद सुखलाल मौरे (रा. गणेगाव खालसा ता शिरुर मुळ रा. सिध्दवाडी ता चाळीसगाव जि जळगाव) याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्याची फिर्याद होती.
तथापि खून केल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला होता. आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान रांजणगाव एमआयडीसी पोलीस समोर होते सदरचा प्रकार हा गंभीर असल्याने पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीस पकडण्या करीता सुचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ तीन वेगवेगळी पथके तयार करून त्यांना आरोपीचा शोध घेणे बाबत सूतना दिल्या होत्या.
वरील पथकांनी सदर आरोपीचा मलठण, पिंपरी दुमाला तसेच परीसरातील साखर कारखाने, तसेच कारखान्याच्या आजूबाजूला असलेल्या ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांकडे शोध घेतला. तसेच संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा जिल्हा नगर येथे जाउन पोलीस पथकाने तेथील ऊस तोडणी कामगारांचे कडे, हॉटेल व्यवसायिकांकडे व काही शेतकऱ्यांकडे आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी मिळून येत नव्हता. त्यानंतर पोलीस पथकांनी सदर आरोपीचा शोध हा पाचोरा जि जळगाव, तसेच आरोपीचे मुळ गावी दडपिंपरी ता. चाळीसगाव जि. जळगाव येथे जाऊन शोध घेतला परंतु कोणते धागेद्वारे पोलीसांच्या हाती लागत नव्हते, तसेच दौंड व यवत भागातील उसाचे गु-हाळा वर जाउन तेथिल उसतोड कामगांरा कडे आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी मिळुन आला नव्हता.
सदर आरोपीचा शोध सुरू होता दि 12/03/2025 रोजी पोलिसांना सदर आरोपी हा त्याचे मूळ गावी दडपिपंरी ता चाळीसगाव जि जळगाव येथे येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सहा फौजदार दत्तात्रय शिंदे, पो हवा संतोष औटी, पो काँ प्रविण पिठले, पो काँ योगेश गुंड यांचे एक पथक त्याचे मूळ गावी पाठवले, पोलीस सदर आरोपीच्या गावात वेशांतर करून सापळा लावुन बसलेले असताना आरोपी लपतछपत त्याच्या गावात येत असताना पोलिसांनी त्याला शिताफिने तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली सदस्चा आरोपी हा गुन्हा केल्या पासून फरार होता तो मोबाईल वापरत नसल्याने त्याला अटक करण्याचे पोलीसांना आव्हान होते. परंतु पोलीसांना आरोपीला पकडण्यात यश आले. सदर आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी अटक करुन कोर्टात हजर केले असता कोर्टाने सदर आरोपीस 6 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोसई शिवाजी मुंढे हे करत आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागिय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक महादेव वाघमोडे, पोसई शिवाजी मुंडे, पोसई अविनाश थोरात, सहाफौज दत्तात्रय शिंदे, पोहवा विजय सरजिने, पोहवा संतोष औटी, पो हवा संदिप जगदाळे, पो हवा विलास आंबेकर, पो. कॉ योगेश गुंड, पो. कॉ उमेश कुतवळ, पो. कॉ प्रविण पिठले, पो. काँ किशोर शिवणकर, यांचे पथकाने केली.
