गोवा बनावटीची ६० लाखाची दारू वाहतुक करणा-या ट्रक चालकास घेतले ताब्यात

Dhak Lekhanicha
0

 गोवा बनावटीची ६० लाखाची दारू वाहतुक करणा-या ट्रक चालकास घेतले ताब्यात 

शिरूर पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई


शिरूर : सुदर्शन दरेकर 

 दिनांक १०/०३/२०२५ रोजी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आप्पसाहेब कदम व शेखर झाडबुके हे दोघेजण वाहतुक नियमन डयुटी करत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे शिरूर गावचे हद्दीत बोराडे मळा येथील पुणे अहिल्यानगर लेनवर असणारे भारत पेट्रोलपंपासमोर गोवा येथील बनावट दारू भरून असलेला एक टाटा कपंणीचा टेम्पो एम एच ४८ सी बी ३६०५ हा उभा आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक मा. श्री संदेश केंजळे, यांना सदरची बातमी कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमदार आप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके, निरज पिसाळ यांना कारवाई करण्याचे आदेश दिले.


पे

पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे , यांचे आदेशान्वये  शुभम चव्हाण, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम,, शेखर झाडबुके, निरज पिसाळ असे मौजे शिरूर गावचे ह‌द्दीत बोराडे मळा येथील पुणे अहिल्यानगर लेनवर असणारे भारत पेट्रोलपंपासमोर एक टाटा कपंणीचा टेम्पो एम एच ४८ सी बी ३६०५ यावरील चालक मोहम्मद इम्रान मोहम्मद सलिम शेख, वय ३७वर्ष, रा रूम नंबर ५/७ आझाद नगर झोपडप‌ट्टी जैनक स्टोअर्स जवळ जी एस टेलर घाटकोपर वेस्ट मुंबई यास गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयामध्ये १) ६०,४८,०००/- रूपयाची गोवा बनावटीची दारू २) १५,००,०००/- टाटा कपंणीचा टेम्पो त्याचा आर टी ओ रजि नंबर एम एच ४८ सी बी ३६०५ हे जप्त करण्यात आले असुन सदर गुन्हयामध्ये एकूण ७५,४८,०००/-रूपये माल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करीत आहेत.



सदरची कार्यवाही ही  पोलीस अधिक्षक  पंकज देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक  रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत ढोले साो, मा. पोलीस निरीक्षक  संदेश केंजळे , यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक . शुभम चव्हाण, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव, पोलीस अमंलदार आप्पासाहेब कदम, शेखर झाडबुके, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार निरज पिसाळ, सचिन भोई, नितेश थोरात, अजय पाटील, रविंद्र आव्हाड यांचे पोलीस पथकाने केली आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!