नराधम बलात्कारी दत्ता गाडेच्या शोधात ! पुणे पोलिस प्रशासन उसाच्या शेतात!

Dhak Lekhanicha
0

 नराधम बलात्कारी दत्ता गाडेच्या शोधात ! पुणे पोलिस प्रशासन उसाच्या शेतात!



शिरूर प्रतिनिधी -  स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला शोधण्यासाठी शंभरहून अधिक पोलिसांचा फौज फाटा गुनाट निर्वी रोडवरील उसाच्या शेतात घुसला आहे. पोलिसांबरोबर स्थानिक नागरिक देखील शोध मोहिमेत सहभागी झाल्याचे चित्र आहे. 

            गाडे  याचे लोकेशन त्याचे गाव गुनाट भागात आढळून आल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा गुनाट  परिसरात दाखल झाला.

 गुनाट परिसरातील उसाच्या क्षेत्रामध्ये बिबट्यांचा वावर आढळून आलेला आहे.अनेक ठिकाणी हल्ल्यात नागरिक ठार झाल्याचे वास्तव आहे. अशा अवस्थेत आरोपीला शोधणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. तरी देखील शंभरहून अधिक पोलीस तसेच स्थानिक नागरिक यांनी गुनाट निर्वि रस्त्यावर भाऊसाहेब फंड यांच्या शेता भोवताली असणाऱ्या उसाच्या क्षेत्रात प्रवेश करून शोधमोहीम सुरू केली आहे. या क्षेत्रावर ड्रोनची नजर असून पोलीस ध्वनी प्रेक्षकाच्या माध्यमातून गाडे याला शरण येण्याचे आवाहन करताना दिसत आहे. संध्याकाळची वेळ असून उसाच्या क्षेत्रात बिबट्याच्या वावरामुळे गाडेची शोध मोहीम सुरू ठेवणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे.

या शोध मोहिमेत पुणे ग्रामीण व साताऱ्याचे ड्रोन व  पथक,क्राईमच्या दहा पथके ७० जणांचा एक पथक, गणवेशातील 100 पोलिस व 200 ग्रामस्थ सहभागी होते ही मोहीम सहायक उपायुक्त  निखिल पिंगळे यांच्या  मार्गदर्शनाखाली सुरु होती.

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!