शिरूरला शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या वतीने विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले
शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली, शिरूर शहरात नगरपालिका हॉल समोर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
शिवसेना शिरूर शहर यांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गीतांजली ढोमे ,ॲड सुभाष पवार ,शहर प्रमुख मयूर थोरात, नामदेवराव घावटे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शिवसेना शिंदे गट यांच्यावतीने शहरातील आठ महिलांचा सन्मान पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
संघटक सुरेश गाडेकर, महिला आघाडीच्या सुजाता पाटील ,अध्यात्मिक आघाडीचे प्रमोद महाराज जोशी उपस्थित होते.
कार्यक्रमात हॉटेल व्यवसायिका सुलोचना रामदास गिरमकर,सिंधू फाउंडेशनच्या उषा शैलेश,वाखारे, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे ,जिम चालक व हॉटेल व्यवसायिका प्रिया बिरादार, ॲक्टिव्ह ग्रुपच्या कामिनी बाफना,ॲड सोनाली अच्छा, महिला पोलिस कॉन्स्टेबल प्रतिभा देशमुख, डॉ.कीर्ती मदने या महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सतीश धुमाळ यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत शहर प्रमुख मयुर थोरात व शहर संघटक सुरेश गाडेकर यांनी केले व आभार सुजाता पाटील यांनी मानले.



