बुलेट सायलन्सर मधुन कर्कश आवाज करणा-या ३५ बुलेट सायलेन्सर वर फिरवला बुलडोझर" शिरूर वाहतुक शाखेची धडाकेबाज कारवाई
शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
शिरूर शहरामधील कॉलेज, शाळा, बस स्टैंड व गर्दीचे ठिकाणी बुलेट सायलन्सर मधुन फटाके फोडणा-या/कर्कश आवाज करणा-या चालकांवर व बुलेट सायलेन्सरवर कारवाई करण्याचे आदेश शिरूर पोलीस स्टेशन वाहतुक शाखेला देवुन त्या अनुषंगाने वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे , महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव,पोलीस अंमलदार विरेंद्र सुंभे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम,पोलीस अंमलदार ज्ञानदेव गोरे, पोलीस अंमलदार विकी मैंद यांचे पथक तयार केले.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव पोलीस अंमलदार विरेंद्र सुंभे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, पोलीस अंमलदार ज्ञानदेव गोरे, पोलीस अंमलदार विकी मैद यांनी शिरूर शहरामधील कॉलेज, शाळा, बस स्टॅन्ड, गर्दीचे ठिकाणी गस्त करून कारवाई करत एकुण ३५ बुलेट मोटारसायकल ताब्यात घेवुन त्यांचे कर्कश आवाज करणारे ३५ सायलेन्सर जप्त करण्यात आले होते.दिनांक १८/०३/२०२५ रोजी वरील जप्त करण्यात आलेल्या कर्कश आवाज करण्या-या ३५ बुलेट मोटारसायकलचे साईलेन्सरवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे
शिरूर पोलीस स्टेशन शहर व ग्रामीण भागामधील चार चाकी वाहनांचे काळया काचांचे फिल्मींग असल्यावर त्यांचेवर दंडात्मक कारवाई करून गाडीच्या काचेचे फिल्मीग जागेवरच फाडण्यात येणार असल्याबाबत पोलीस निरीक्षक केंजळे यांनी सांगीतले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी . प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशन वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र वाघमोडे, महीला पोलीस हवालदार भाग्यश्री जाधव पोलीस अंमलदार विरेंद्र सुंभे, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, पोलीस अंमलदार आप्पासाहेब कदम, पोलीस अंमलदार ज्ञानदेव गोरे, पोलीस अंमलदार विकी मैंद यांचे पोलीस पथकाने केली आहे.
