गुजर मळा शिरूर येथून होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल चोरीला
शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर
शिरूर सह तालुक्यात चोरीच्या वाढत्या घटना घडताना दिसत आहेत, मोटरसायकल चोरीच्या अनेक घटना शिरूर पोलिसांनी उघड केले असल्या तरी वारंवार रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे मोटरसायकल चोरीच्या घटना करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी आकाश मधुकर चाकणे रा. गुजर मळा तालुका शिरूर यांची हिरो होंडा शाईन मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना घडली असून शिरूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी यांच्या घरा समोरील पार्किंग मध्ये लावलेली गाडी अज्ञात चोरट्याने लंपास केली असून याबाबत अधिकचा तपास अंमलदार वारे पोलीस हवालदार जगताप हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
.jpg)