भागीदारीमध्ये व्यवसायाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक गुन्हा दाखल
शिरूर : सुदर्शन दरेकर
शिरूर येथील विठ्ठल नगर परिसरातील दांपत्याची फसवणूक झाल्याची तक्रार शिरूर पोलीस स्टेशन येथे दाखल झाली असून आरोपी सुनीता राहुल भांगे राहुल नवनाथ भांगे ऋषी नवनाथ भांगे राहणार केसनंद रोड वाघोली यांच्याविरुद्ध सविता अशोक मेसे यांनी शिरूर येथे फिर्याद दाखल केली असून याबाबत शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याबाबत सविस्तर वृत्त,
पनीर तयार करणे व वाटाणे सोलणे व प्रक्रिया उद्योग चालू करण्याचे खोटे आश्वासन देऊन शिरूर शहरातील सविता अशोक मेसे यांची एक कोटी 84 लाख 666 रुपयाची फसवणूक केली असून याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे अंमलदार झेंडगे व अंमलदार वाडेकर हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत
.jpg)