धक्कादायक....!श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी परिसरामध्ये विहिरीत मुंडके व दोन हात एक पाय नसलेला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
शिरूर (अनिल सोनवणे)-
अहील्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील दानेवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका विहिरीत मुंडके, दोन हात व एक पाय नसलेला मृतदेह आढळून आल्यामुळे शिरूर व श्रीगोंदा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. याबाबत घडलेली घटना अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी परिसरामध्ये वय अंदाजे २५ ते ३० वर्ष असलेला एका अज्ञात व्यक्तीचा, पुरुष जातीचा मृतदेह एका पोत्यामध्ये बांधून त्याच्यामध्ये दगड गोटे भरून तो विहिरीमध्ये टाकण्यात आला होता.
ही बाब आज लक्षात आली. यानंतर संबंधितांनी तात्काळ या प्रकरणी बेलवंडी पोलिसांना याबाबत माहिती कळवली. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. व विहिरी मधून मृतदेह वरती काढण्यात आला. या मृतदेहाला डोके नसून, दोन हात व एक पाय देखील तोडण्यात आल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरामधील नागरिकांनी घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केली होती.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये शव विच्छेदनासाठी घेऊन गेले आहेत. अतिशय निर्दयपणे या युवकाचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा अनोळखी युवक कुठला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलीस विभागाकडून सुरू झाले आहे.त्याचा मृतदेह या ठिकाणी कसा आला. त्याचा खून करण्यात आला आहे का. याबाबत बेलवंडी पोलीस स्टेशनचे मारुती कोळपे हे पुढील तपास करीत आहे.
हा मृतदेह शिरूर येथून दाणेवाडी येथील महाविद्यालयीन तरुणाचा असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. जीवाचा थरका उडवणारा मृतदेह पाहून अनेकांच्या जीवाची घबराट उडाली. मृतदेहाचे शीर दोन्ही हात व पाय सापडलेला नाही.
नक्की हा मृतदेह कोणाचा याबाबत शंका कुशंका सुरू असली तरी दानेवाडी ता श्रीगोंदा येथील माऊली सतिश गव्हाणे हा 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुण ७ मार्च २५पासून बेपत्ता असल्याचे त्याचे चुलते अनिल परशुराम गव्हाणे यांनी सांगितले याबाबतची मिसिंगची फिर्याद त्याचा भाऊ अविनाश सतीश गव्हाणे यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे दिली आहे.
परंतु हा मृतदेह नक्की त्याचा का ?आणखी कोणाचा याबाबत आज तरी शंका आहे.
मृतदेह नेमका कोणाचा?
शिरूर पोलीस स्टेशन येथे आज मिसिंग तरुणाचे कुटुंबीय व नातेवाईक यांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांची भेट घेतली असून, दाणेवाडी येथे सापडलेला मृतदेह हा त्यांच्यात मुलाचा का अजून कोणाचा ?.परंतु मृतदेहाचे शीर, दोन्ही हात, उजवा एक पाय नसलेला , डावा पाय अर्धा तुटलेला अवस्थेत सापडल्याने कुटुंबही द्विधा मनस्थिती मध्ये आहे.
शिरूर पोलिसांनी तपासाची गती वाढवली!
मिसिंग फिर्यादी बाबत चौकशी सुरू असून सीसी टीव्ही कॅमेरे फुटेज जमा करण्याचे काम सुरू आहे. दाणेवाडी येथील मृतदेह बाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग, श्रीगोंदा पोलीस, अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभाग पथके तपासासाठी रवाना झाली असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली
