रावडेवाडी शिरूर येथील विवाहिता बेपत्ता
शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
सोमनाथ सखाराम पोकळे वय 27 वर्षे रा. रावडेवाडी यांनी फिर्याद दिली असून पत्नी प्रितम ही शिरूर येथे ब्युटी पार्लरच्या कोर्ससाठी जाते म्हणून घरातून निघून गेली असून अद्याप पर्यंत घरी आली नाही. शिरूर पोलीस स्टेशन येथे कायदेशीर फिर्याद नोंदवलेली असून याबाबत सविस्तर वृत्त असे,
प्रीतम सोमनाथ पोकळे वय 22 वर्षे राहणार-रावडेवाडी ता. शिरूर जि. पुणे. चेहर-उभट, उंची 155 सेंमी. रंग-गोरा, अंगाने सडपातळ, नाक-सरळ, केस काळे लांब, गळयात मणी मंगळसूत्र, नाकात पिवळ्या धातूची मुरणी, कानात-पिवळ्या धातूची फूले, पायात जोडवी, अंगात-पांढरे रंगाचा फूल बाहीचा टॉप, खाली निळ्या रंगाची पॅन्ट, गळयात निळ्या रंगाची ओढणी, पायात- हिव्या रांगची साधी चप्पल, डाव्या हातात काळे रंगाचे साधे घड्याळ, भाषा-मराठी, हिंदी, इंग्रजी बोलते, शिक्षण-टी. वाय.बी.ए. तसेच एक निळ्या रंगाची सॅक, बरोबर असून,
मलठण, ता. शिरूर जि. पुणे येथील शिंदेवाडी एस.टी. बस स्टॉपवरून शिरूर येथील यु.के. सलून अॅकॅडमी येथे पार्लरचे कोर्स साठी गेली ती अदयाप पर्यंत आमचे राहते घरी न येता कोठे तरी निघून गेली आहे. तरी तिचा शोध नातेवाईक व इतरत्र घेऊनही सापडत नाही त्यामुळे शिरूर पोलीस स्टेशन येथे कायदेशीर तक्रार दिली आहे.
याबाबत अधिकचा तपास सहा. फौजदार साबळे
पोलीस हवालदार उबाळे हे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
