भिवडी येथील स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न!
कुडाळ (कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर) -
भिवडी तालुका जावली येथील उद्योजक विशाल साहेबराव जांभळे यांनी स्वखर्चातून कै. साहेबराव गुलाबराव जांभळे यांच्या जयंतीचे औचित्य साधून भिवडी गावच्या प्रवेशद्वारावर भव्य स्वागत कमान स्वखर्चातून उभी केली असून. त्याचा लोकार्पण सोहळा सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात भिवडी येथे पार पडला. उद्योजक विशाल जांभळे यांचे गावच्या विकासात मोठे योगदान राहिलेले आहे. कोरोना काळात त्यांनी परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर केलेला होता. तसेच स्वखर्चातून गावच्या महादेव मंदिराची उभारणीही स्वखर्चातून केली आहे.
भिवडी गावच्या प्रवेशद्वारावर उभी केलेली स्वागत कमान ही गावच्या सौंदर्यात मोठी भर घालणार आहे. असे उद्गार मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले. यावेळी जिल्ह्याचे नेते वसंतराव मानकुंबरे, संचालक ज्ञानदेव रांजणे सौरभ बाबा शिंदे
सरपंच श्रीकांत निकम, सर्व आजी माझी ग्रामपंचायत सदस्य, मंदिर कमिटीचे अध्यक्ष रामदास दरेकर, राजेंद्र किर्दत, राजेंद्र सपकाळ, भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद पवार तसेच भिवडी गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
